

गडचांदूर –आज दिनांक ८ मार्च रोजी गडचांदूर भाजपा पार्टी महिला आघाडीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून भाजपा कार्यालयात 12 वर्षीय आतील मुलींना (good touch ,bad touch) चांगला स्पर्श,वाईट स्पर्श कसे असते याबद्दल ऍड दिपंजली मंथनवार व डाँ सौ कविता पिंपळशेंडे,व सौ विजयालक्ष्मी डोहे भाजपा जिल्हा महामंत्री यानी उपस्थित मुलींना मार्गदर्शन केले.तसेच महिला करिता नवीन कायदेविषयक गडचांदूर पोलीस स्टेशनचे महिला कॉन्स्टेबल सौ.रेखा सुरनार मॅडम यांनी मार्गदर्शन केले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सौ.रंजनाताई मडावी भाजपा जिल्हा सचिव , सौ अर्पणा उपलेंचिवार,यांच्या उपस्थितीत दहा ते बारा वयोगटातील मुलींची उपस्थित होती .यावेळी भाजपा महिला आघाडीच्या कार्यकर्त्या सौ.किरण सदनपवार सौ.सपना सेलोकर,सौ.दाळेताई ,सौ.गोरडवार ताई,सौ.कावटकर ताई,सौ.साळवे यांची प्रामुख्याने उपस्थित होती.
जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे सांगता करण्यात आले.