नांदाफाटा येथे गुरू रविदास जयंती साजरी

कोरपना – संत शिरोमणी गुरु रविदास महाराज बहुउद्देशीय संस्था नांदाफाटा यांच्या वतीने समाज क्रांतीचे प्रणेते संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती नांदाफाटा येथे साजरी करण्यात आली .
देशात समानतेची शिकवण देऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचे महान कार्य संत रविदास महाराज यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष सतिश लांडे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बिबी ग्रामपंचायतचे उपसरपंच आशिष देरकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाजाचे जेष्ठ नागरिक आनंदराव लांडे, मारोती बुडे, भोलाजी खंडाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालन गोकुल बन्सोड यांनी केले तर आभारप्रदर्शन हरीश खंडाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विलास टिकले, जीवन बचाशंकर, कवडु टिकले, रामभाऊ धुळे, पारस वाढई, वासुदेव पंचवटे, नितीन येरेकर, पंकज पवार व मंडळाच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *