

माणिकगड सिमेंट स्कुल मध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना दिलासा…
गडचांदूर,,(ता,प्र) जगात व देशात कोरोना सारखी विषाणु महामारी आली.त्यातल्या त्यात सर्व व्यवहार बंद झाले,नागरिकांच्या हाताला काम नाही जगायच कस, पोट भरायच कस असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला , शाळा महाविद्यालय सुरु झाले.व मुलांच्या शाळेची फि भरावी कसी हा प्रश्न पालकांसमोर निर्माण झाला.राजुराविधान सभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांचा मार्गदर्शना खाली नगराध्यक्षा सौ. सविता टेकाम नगरसेवक, पापयाजी पोन्नमवार शहर काँगेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे यानी माणिकगड सिमेंट कंपनीच्या व्यस्थापकासोबत चर्चा करुण अखेर शाळेच्या फि चा तोड़गा काढला व 25% फिस माफ करण्याचा निर्णय माणिकगड कंपनीच्या व्यवस्थापकांनी घेतला, व पालकांना थोडा का होईना फी बाबत दिलासा मिळाला ,या वेळी अशोक जाधव,कैलास म्हस्के,विनय चव्हाण,महेश गोरे, मनोज सातभाई, बोरुळे सर ,मयुर एकरे उपस्थित होते. मणिकगड सिमेंट कंपनीचे या निर्णयाबाबत सर्व पालकांनी अभिनंदन केले आहेत,