गौण खनिज चोरीला कोरपना तहसीलदाराची मुकसंमती !!

विजय ठाकरे यांनी SDO कडे तक्रार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

गडचांदूर : गडचांदूर येथे गौण खनिजाची चोरी करीत असल्यामुळे KTC लाजेस्टिक कंपनीचे संचालक अब्दुल मजीद खान व इतर यांच्या विरोधात राजुरा उपविभागीय अधिकारी खराडे यांच्याकडे विजय झेड. ठाकरे यांनी तक्रार केली आहे.

KTC लाजेस्टिक कंपनी आदिलाबाद साइट ऑफिस सुखकर्ता मंगल कार्यालयाजवळ गड़चांदूर येथे स्वतःच्या वाहनासाठी ट्रक यार्ड व डीजल पंप सुरू केला आहे. त्या ट्रक यार्ड व डीजल पंपचे खडीकरण व पक्के बांधकाम करण्यासाठी वैध गौण खनिज परवाना नसताना राष्ट्रीय संपत्ती असलेले गौणखनिज चोरीच्या मार्गाने अवैधरित्या ठिकाणी आणले जात आहे. हे ठिकाण गड़चांदुर – राजुरा हायवे रोडलगत आहे. या घटनास्थळी तहसीलदार महेंद्र वाकलेकर कोरपना यांनी मौका पाहणी केली. परंतु गैरअर्जदार ह्यांच्या कडून लक्ष्मीदर्शन झाल्यामुळे हजारो टन गौण खनिज तहसीलदार यांनी त्यांना उपलब्ध करून दिले. त्यांनी कुठलीही कार्यवाही न करता आल्या पावली परत गेले. त्यामुळे गैरअर्जदार जेवढे गुन्हेगार आहेत तेवढेच तहसीलदार वाकलेकर सुद्धा गुन्हेगार आहेत, असा गंभीर आरोप विजय ठाकरे यांनी सदर तक्रारीत केला आहे.
या गैरप्रकाराची दखल घेऊन KTC लाजेस्टिक कंपनीचे संचालक अब्दुल माजिद खान व इतर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र राज्य गौण खनिज एक्ट अनुसार दंडात्मक व CRPC एक्ट अनुसार फौजदारी कार्यवाही करण्यात यावी व तहसीलदार कोरपना वाकलेकर यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *