महाराष्ट्र भाजपात फेरबदल होणार? प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, म्हणाले…!

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील भाजपा नेत्यांची दिल्लीवारी सातत्याने होऊ लागली होती. भाजपाचे काही प्रमुख नेते दिल्लीत पक्षातील वरीष्ठांच्या भेटी घेत असल्यामुळे राज्यातील भाजापा संघटनेमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यातही प्रामुख्याने प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जाही पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. मात्र, या चर्चेला खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच पूर्णविराम दिला आहे. माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुण्यात एका कार्यक्रमात आले असताना पत्रकारांशी बोलताना यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

राज्याच्या प्रश्नांसाठी भेटीगाठी
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील भेटीगाठी महाराष्ट्राच्या प्रश्नांवर असल्याचं सांगितलं. “कोणतेही संघटनात्मक बदल नाहीत. नवीन मंत्रिमंडळ झालं आहे. नव्या मंत्र्यांच्या भेटीगाठी, काही महाराष्ट्राचे प्रश्न यासाठीच हे दौरे आहेत. महाराष्ट्रात संघटनात्मक कोणतेही बदल नाहीत”, असं ते म्हणाले.

प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कोणतीही चर्चा नाही
दरम्यान, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष बदलण्याची कोणतीही चर्चा नसल्याचं स्पष्ट केलं. “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अतिशय चांगलं काम करत आहेत. पक्ष त्यांच्या पाठिशी आहेत, दिल्लीतील हायकमांड त्यांच्या पाठिशी आहेत. आम्ही सगळे त्यांच्या पाठिशी आहोत. कृपया कंड्या पिकवू नका, पतंगबाजी करू नका. चुकीच्या बातम्या करू नका. बातम्या कमी पडल्या, तर मला बातमी मागा”, असं म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांना देखील टोला लगाव

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *