गझल अमृत दिवाळी अंक २०२२ प्रकाशन समारंभ

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना –
गझल मंथन साहित्य संस्था कोरपना जि. चंद्रपूर द्वारा गझल मंथन साहित्य संस्थेची मार्गदर्शक समिती आणि दिवाळी अंकाचे कार्यकारी संपादक डॉ. शिवाजी काळे, डॉ. स्नेहल कुलकर्णी व प्रमोद खराडे तसेच व्यवस्थापकीय संपादक निलेश कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा सलग तिसरा दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. दिनांक ०६/११/२०२२ रोज रविवार ला सकाळी ११ वाजता कोरपना येथे प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. प्रकाशन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून राजेश राजगडकर माजी उपमुख्य अभियंता चंद्रपुर महा औष्णिक वीज केंद्र, चंद्रपूर तर उद्घाटक म्हणून धनंजय साळवे संवर्ग विकास अधिकारी पं.स.गडचिरोली लाभले आहेत. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून डॉ. किशोर कवठे, प्रविण आडेकर, डॉ. दिपक मेश्राम मा. डॉ. प्रकाश खनके, नितीन बावणे, प्रा. मारोती जुनगरी, ओम पवार, दादाजी आडकिने, विशाल गज्जलवार आणि प्रा. अरुण कुकडे यांची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी आयोजित गझल मुशायऱ्याचे अध्यक्ष स्थान गझलकार राम रोगे (नांदा) भुषविणार असून सुत्रसंचालन गझलकार नरेशकुमार बोरीकर (चंद्रपुर) करणार आहेत. या मुशायऱ्याला राजेंद्र घोटकर (घुग्घुस), डॉ. अर्चना जुनघरे (राजुरा), राजेश देवाळकर (बल्लारशाह ), विरेनकुमार खोब्रागडे ( राजुरा), संतोषकुमार उईके (गोंडपिपरी), श्री. चंद्रशेखर कानकाटे (वरोरा), दिलीप पाटील (राजुरा), सुनिलकुमार बावणे (बल्लारशाह) प्रविण आडेकर (भद्रावती) आणि प्रविण तुरानकर (राजुरा) यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी कवी प्रदिपजी देशमुख (उपाध्यक्ष सुर्या सा. संस्था चंद्रपूर) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित निमंत्रितांच्या कवी संमेलनामध्ये श्री.बी.सी. नगराळे (संस्थापक फिनीक्स साहित्य संस्था, चंद्रपूर) प्रमुख अतिथी राहणार आहेत. या कवी संमेलनाचे संचालन नरेंद्र कन्नाके (वरोरा) करणार आहे या कवी संमेलनामध्ये विजय वाटेकर (चंद्रपूर), सुरेख इंगळे (चंद्रपूर),. धर्मेंद्र कन्नाके (चंद्रपुर), गोपाल शिरपुरकर (चंद्रपूर), मिलेश साकुरकर (चंद्रपुर), पंडीत लोढ ( वरोरा), अरुण घोरपडे (चंद्रपुर), सुधाकर कन्नाके, उमेश पारखी (राजुरा), शीतलताई कर्णेवार (देवाडा), ईश्वर टापरे (वरोरा), प्रा. निरज आत्राम ( बरोरा), अविनाश पोईनकर (बिबी),. सुनिल पोटे (राजुरा), रत्नाकर चटप (नांदा ), चंदु झुरमुरे (नांदा), अर्जुमनताई शेख (बल्लारशाह), रोशनकुमार पिलेबान, भारतीताई लखमापुरे (वरोरा), डॉ. सुधिर मोते (भद्रावती), अनील पिट्टलवार (भद्रावती) या निमंत्रित कवींचा सहभाग असणार आहे.
गेल्या दोन वर्षापासून गझल अमृत दिवाळी अंकाची प्रकाशन पूर्व १०० टक्के विक्री होते. गझल रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे अल्पावधीतच ‘गझल अमृत’ दिवाळी अंकाने दिवाळी अंक विश्वात आपले महत्त्व अधोरेखित केले आहे. यंदाच्या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील नामवंत मान्यवर गझलकारांचे अभ्यासपूर्ण लेख आहेत. सोबतच महाराष्ट्रातील २०० पेक्षा अधिक नामवंत मराठी गझलकारांच्या गझलांचा समावेश आहे. ‘गझल अमृत’ संग्रही ठेवण्यासाठी तसेच संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त असलेला दर्जेदार दिवाळी अंक आहे. गझल अमृत दिवाळी अंकाचे मुख्य संपादक जयवंत वानखडे असून कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी डॉ. शिवाजी काळे , डॉ. स्नेहल कुलकर्णी आणि प्रमोद खराडे यांनी तर निलेश कवडे यांनी व्यवस्थापकीय संपादक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. २०२१ च्या ‘गझल अमृत’ दिवाळी अंकाला चिरांगन दिवाळी अंक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सदर प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संपादक तथा गझल मंथन साहित्य संस्थेचे सचिव जयवंत वानखडे ( मो. ९८२३६४५६५५ ) यांच्यासह गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष अनिल कांबळे, उपाध्यक्ष देवकुमार आणि प्रसिद्धीप्रमुख भरत माळी यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *