अंचलेश्वर मंदिराचा प्रसाद योजनेत समावेश करणार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला* *जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र बनविणार*
*⭕महाकाली मंदिराच्या विकासा unला गती देण्यास पुरातत्व विभागाकडून सहमती घेणार*
*विकासासाठी सर्वोपरी सहकार्याचे केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांचे सुधीर मुनगंटीवार यांना आश्वासन*

नवी दिल्ली, ता. २३ : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वैभव प्राप्त आहे. येथील श्री अंचलेश्वर मंदिराच्या विकासासाठी या मंदिराचा समावेश प्रसाद योजनेत करण्यास केन्द्र सरकार निश्चित सकारात्मक आहे, लवकरच ही प्रक्रिया सुरु होईल अशी ग्वाही केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री किशन रेड्डी यांनी दिली. श्री अंचलेश्वर मंदिर परिसराचा गतीनेविकास व्हावा तसेच केन्द्र शासनाच्या प्रसाद योजनेत समावेश व्हावा या मागणीसाठी महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी श्री किशन रेड्डी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.

श्री अंचलेश्वर मंदिर ५५० वर्ष पुरातन आहे. गोंड राजांनी त्यांची उभारणी केली होती. चंद्रपूर अठराव्या शतकापर्यंत गोंड राजधानी होती. श्री अंचलेश्वर येथे शिवमंदिर असून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. चंद्रपूर महानगरात असलेल्या या मंदिर व परिसराचा विकास व्हावा, असा आग्रह आ. मुनगंटीवार यांनी रेड्डी यांच्याकडे धरला.

आ. मुनगंटीवार यांनी दिलेल्या प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर रेड्डी यांनी मंदिराचा जीर्णोद्धार, संरक्षक भिंत उभारणी, सुसज्ज प्रकाश व्यवस्था, भव्य प्रवेशद्वार, अन्य मुलभूत सुविधा, स्वच्छता याबाबत विकास आराखडा यासंदर्भात देखील सकारात्मक चर्च केली.

*ताडोबा अंधारी चा जागतिक पर्यटन केंद्राचा दर्जा मिळावा*
यासोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी आणि जगातील पर्यटक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे आकर्षित व्हावे यासाठी केन्द्र शासनाने पुढाकार घ्यावा अशी मागणी श्री सुधीर मुनगंटीवार यांनी श्री रेडी यांच्याकडे केली. यावर बोलताना त्यांनी रेड्डी यांना या व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्याची विनंती केली. केंद्रिय मंत्र्यांनी श्री मुनगंटीवार यांच्या विनंतीवरून सरकार नक्कीच पर्यटन विकास करण्याच्या दृष्टीने येथे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

*श्री महाकाली मंदिराचा विकास*
जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री माता महाकाली मंदिराच्या विकासाकरिता ६० कोटी रुपये निधी मंजुर झाला आहे; परंतु पुरातत्व विभागाकडून विकास कार्यास ना हरकत मिळत नसल्याने काम रखडले आहे. या विषयाची दखल घ्यावी असा आग्रह श्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री श्री किशन रेड्डी यांच्याकडे केला. यावर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन श्री रेड्डी यांनी दिले.

–.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *