थेट पंतप्रधान मोदीजीनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आमंत्रित करून सन्मानित केलं..

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

हे आहे पुण्यातील श्री.योगेश चितळे आणि सौ.सुमेधा चितळे एक निवृत्त जोडपे. यांचे सुपुत्र सध्या भारतीय लष्करामध्ये मेजर पदावर कार्यरत आहे. सियाचीन येथील आपल्या जवानांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो तो वाढवण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करता यावी या करिता दोघांनी आपले सर्व दागिने व संपत्ती विकून 1.25 कोटी रूपये उभे केले. सध्या हे सिलिंडर छत्तीसगढ येथून आणावे लागत होते परंतु ह्या प्रकल्पाची उभारणी झाल्यावर ते तिथेच उपलब्ध होणार असून त्यामुळे जवळपास 9000 जवानांना थेट फायदा होणार आहे.

एक एक रुपयापासून स्वतःची तुंबडी भरण्याच्या आजच्या काळामध्ये राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे असे एखादे उदाहरण विरळच.. 🙏🏻
देशाला तुमचा अभिमान आहे

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here