केंद्रस्तरीय प्रथम शिक्षण परिषद*

 

लोकदर्शन पवनी 👉अशोक गिरी

‌‌पवनी:- शैक्षणिक सत्र -०२३-०२४ मधील केंद्रस्तरीय प्रथम शिक्षण परिषद न.प.लाल बहाद्दुर शास्त्री केन्द्रीय प्राथमिक शाळा पवनी येथे संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा रोहणकर, प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी प्रशासन अधिकारी आरिफ शेख, साधनव्यक्ती डॉ.मुरलीधर रेहपाडे, मंजुषा दलाल, विषय तज्ञ महेंद्र वाहने, अरविंद लांजेवार, केंद्रप्रमुख राजु तुमसरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पहार देऊन करण्यात आले.डाॅ.मुरलीधर रेहपाडे यांनी निपुण भारत ही संकल्पना स्पष्ट करून दृढीकरण केले तर मंजुषा दलाल यांनी विद्या समिक्षा व‌ सेतू अभ्यासक्रम यांचे स्वरूप व महत्व विशद केले.विषय तज्ञ महेंद्र वाहने यांनी विद्या प्रवेश व तंत्रज्ञानाचा प्रभावी अवलंब अध्ययन -अध्यापनात कसा करावा तसेच दिव्यांगाचे प्रकार,शिक्षण व उपस्थिती यासाठी विविध अॅपचा वापर कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.एकंदरीत आजची शिक्षण परिषद अतिशय आनंद दायी झाली.सदर शिक्षण परिषदेला केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.प्रस्तुत शिक्षण परिषदेचे सुत्रसंचालन केंद्रप्रमुख राजु तुमसरे यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार भारती चौळे स.शिक्षिका यांनी मानले.शेवटी वंदे मातरम् ने शिक्षण परिषदेची सांगता झाली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *