सावित्रीबाई फुले विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा*

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन गडचांदूर👉 (प्रा अशोक डोईफोडे)
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालयात दिनांक ८ मार्चला जागतिक महिला दिनचा कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.याप्रसंगी ज्येष्ठ शिक्षक महेंद्रकुमार ताकसांडे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व समजून सांगितले. भारतातील कर्तबगार महिलांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच त्यांच्यापासून प्रेरणा व त्यांचे आदर्श घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. यावेळी शाळेतील महिला शिक्षिकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाला माधुरी उंमरे ,ज्योती चटक ,सुषमा शेंडे,प्रा सोज्वल ताकसांडे, प्रा अनिल मेहरकुरे ,प्रा डफाडे प्रा सातारकर, प्रा. मुप्पीडवार , बावनकर सर ,मांढरे सर, जी. एन. बोबडे सर, कोगरे सर, वासेकर सर, किंन्नाके सर,आत्राम सर ,यांचे सह सर्व शिक्षक विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *