जगाला सुंदर करण्यात कर्तुत्वान महिला शक्तींचे अनमोल योगदान : आमदार सुभाष धोटे. ♦️जागतिक महिला दिनानिमित्त पं. स. राजुरा च्या वतीने विविध वैयक्तीक लाभार्थीना साहित्यांचे वितरण.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– पंचायत समिती राजुरा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना २०% सेस फंड समाज कल्याण विभाग अंतर्गत शिलाई मशीन, आटा चक्की उभारण्यासाठी धनादेश, ५% दिव्यांग वैयक्तिक लाभ योजने अंतर्गत झेरॉक्स मशीन खरेदीसाठी धनादेश, मानव विकास मिशन अंतर्गत जि प शाळेच्या मुलींना मोफत सायकल अशा विविध वैयक्तीक लाभार्थीना विविध उपक्रमांतर्गत साहित्यांचे वितरण करण्यात आले. तर पं. स. राजुरा अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. आणि किशोरवयीन मुली, महिला जेंडर, आरोग्य, कुटुंबनियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रसंगी आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, जगाला सुंदर करण्यात कर्तुत्वान महिला शक्तींचे अनमोल योगदान आहे. खऱ्या अर्थाने महिलांमुळेच घराला घरपण येते. अनेक आव्हानांना सामोरे जात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. येणाऱ्या काळात आपले हे सामर्थ्य ओळखून आनखी प्रगती करण्यासाठी महिलांनी शिक्षण, तंत्रज्ञान, व्यावसायिक कौशल्य, स्पर्धा परीक्षा आणि सर्वांगीण विकासाची कास धरावी असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उद्घाटक आमदार सुभाष धोटे, प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, माजी सभापती कुंदा जेणेकर, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, गटशिक्षणाधिकारी दिलीप गौरकार, सहाय्यक गटविकास अधिकारी धर्मपाल कराडे, प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम, विस्तार अधिकारी आनंद नेवारे, रवी रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गटसाधन व्यक्ती मुसा शेख, करूणा गावंडे यांनी केले प्रास्ताविक गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *