जि.प.उच्च प्राथ.शाळा तळोधी येथे संविधान दिन साजरा

 

लोकदर्शन 👉 अशोककुमार भगत

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तळोधी येथे संविधान दिन साजरा करण्यात आला.सुरुवातीला गावातून नारे देउन रॅली काढण्यात आली.रॅलीचा समारोप शाळेत होऊन संविधानाची प्रस्तावना घेण्यात आली.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.गावंडे यांनी मार्गदर्शन केले.संतोष जुनगरी यांनी संविधान मानवाच्या कल्याणकारी कसे आहे याबाबत मार्गदर्शन केले.कांतीलाल चव्हाण यांनी बाबासाहेब यांनी संविधान लिहितांना किती अभ्यास केला यांची माहिती सांगितली.अजित साव यांनी संविधानामुळे भारतीय लोकशाही बळकट कशी झाली याबाबत मार्गदर्शन केले.
सुहानी खेवले, मनस्वी कापसे,श्रुष्टि कुंभारे,ममता देहारकर, अविष्का आत्राम, आर्यन संदोकर, प्रतिक कांबळे,संस्कार येसेकार् ,पूजा झुंगरे,ईशांत खेवले या विदयार्थानी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन व आभार गौरव देहारकर याने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here