शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या 40 विद्यार्थ्यांचा सत्कार

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचलित महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर येथील तब्बल 40 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण होऊन पात्र ठरले आहेत, या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली चे परीक्षा संचालक डॉ अनील चिताडे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,मुख्याध्यापीका सौ स्मिताताई चिताडे,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी उद्दिष्ट समोर ठेऊन कठोर परिश्रम घेतले तर जीवनात निश्चितच यशस्वी व्हाल असा संदेश याप्रसंगी डॉ अनिल चिताडे यांनी दिला,व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले मुख्याध्यापीका सौ स्मिताताई चिताडे यांनीआपल्या प्रस्ताविकात कोरोना काळात महात्मा गांधी विद्यालयातील शिक्षकांनी शाळा बंद असताना सुद्धाऑन लाईन व पालकांची परवानगी घेऊन कोरोनाचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांचे शाळेत विशेष वर्ग चालविले विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन वर्ग घेतले त्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन केले आणि त्याचीच फलश्रुती म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथमच शाळेच्या पन्नास वर्षाच्या इतिहासात तब्बल 40 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले ही अभिमास्पद बाब आहे.
कार्यक्रमाचे संचालन हरिहर खरवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रविंद्र चौधरी यांनी केले,
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here