स्टेप आर्ट च्या कलाकारांसोबत राहुल गांधींनी अनुभवला नृत्य करण्याचा आनंद.

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 22 नोव्हेंबर 2022गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या काँग्रेस चे युवराज राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे आगमन महाराष्ट्रात होताच यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे.
रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्रशेठ घरत आणि उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात राजीवजींचे उत्स्फुर्त स्वागत हे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार व्हावे या उद्देशाने भारत जोडो यात्रा अकोला जिल्ह्यात शेगाव येथे असताना कोळी लोकांच्या पारंपरिक वेशात स्टेप आर्ट डान्स अकॅडमी, उरण च्या कलाकारांनी राहुल गांधी यांच्या समोर कोळी नृत्य सादर केले. या नृत्याची राहुल गांधी यांना इतकी भुरळ पडली की स्वतः राहुल गांधी यांनी गाण्याच्या ठेक्यावर ताल धरून त्यांचे नृत्यावर पाय ही थिरकले. स्टेप आर्ट च्या सर्व टीम चे राहुलजींनी अभिनंदनही केले.
स्टेप आर्ट चे सर्वेसर्वा पप्पू सूर्यराव यांनी ही संधी प्राप्त करून देणाऱ्या महेंद्र घरत आणि मिलिंद पाडगावकर यांचे आभार मानले. त्यांच्या समवेत पनवेल काँग्रेस चे नंदराज मुंगाजी आणि मार्तंड नाखवा हे ही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here