मिस आणि मिसेस पिंपरी चिंचवड पुणे २०२२ या फॅशन शो स्पर्धेत श्वेता थोरात प्रथम..

 

लोकदर्शन पुणे 👉 स्नेहा उत्तम मडावी

अंकतज्ञ कांचन लांघी प्रस्तुत सतिश सुर्यवंशी व गणेश गुरव आयोजित मिस, मिसेस पिंपरी चिंचवड फॅशन शो स्पर्धा आचार्य अत्रे सभागृह पिंपरी ता हवेली जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. फॅशन शो स्पर्धेत सत्तर महिलांनी सहभाग नोंदवला होता. फॅशन शो स्पर्धेचे परिक्षक म्हणून अल्ताफ शेख व धनश्री शंखे यांनी काम पाहिले, या फॅशन शो मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस श्वेता थोरात, व्दितीय क्रमांक प्राची गायकवाड, तृतीय क्रमांक पूनम हावळे यांना मिळाले. विजेत्यांचे बक्षीस वितरण लेखक व चित्रपट निर्माते संदीप राक्षे, अंकतज्ञ व व्यवसाय मार्गदर्शक कांचन लांघी यांच्या शुभहस्ते करण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here