डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा-अलिबाग यांच्यावतीने स्वच्छता अभिमान

 

लोकदर्शन (प्रतिनिधी👉-गुरुनाथ तिरपणकर)

-डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा,अलिबाग,जि.रायगड यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य आणि देशपातळीवर तसेच संपुर्ण जगभर विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात.त्याचाच एक भाग म्हणून ठाणे परिसरात रविवारी दि.२०नोव्हेंबर रोजी स्वच्छता अभिमान आयोजित करण्यात आले होते.यावर्षी जेष्ठ निरुपणकार महाराष्ट्र भूषण आदरणीय तिर्थरूप डाॅ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांचे जनशताब्दी वर्ष तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत,याचेच औचित्य साधून सामाजिक उपक्रमाच एक भाग म्हणून या स्वच्छता अभिमानाचे आयोजन करण्यात आले होते.जेष्ठ निरूपणकार पद्मश्री तिर्थरूप डाॅ.श्री.सचिन दादा धर्माधिकारी यांच्या बहुमुल्य मार्गदर्शनातून ठाणे विभागातील राबोडी,कळवा,खारेगाव,अनंतनगर,विटावा,रामनगर आय.टी.आय.,कामगार हाॅस्पिटल,आणि वसाहत इत्यादी विभागात स्वच्छता केली.या उपक्रमात सुमारे १५८३स्वयंसेवकांनी स्वयंस्फुर्तीने सहभाग घेतला आणि २०टन सुका कचरा गोळा केला.याप्रसंगी नगरसेवक,शासकीय कार्यालयातील अधिकारी,महानगरपालिका अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.ठाणे विभागात आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here