महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई च्या वतीने मंदिर भेटी व समाज बांधव जन संपर्क अभियान पाचवा टप्पा* *संपन्न* ..!

लोकदर्शन इचलकरंजी👉 (-गुरुनाथ तिरपणकर)

महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळाच्या वतीने म.गांधी जंयंती पासुन राज्यव्यापी समाज संघटन सक्षम करणेसाठी “धागा धागा अखंड विणू या ,कोष्टी समाज एक करू या”या करीता समाज बांधवाना भेटणेसाठी गावातील श्री चौन्डेंश्वरी मंदिर येथे मिटींग घेवून कोष्टी समाज संपर्क करणेची सुरवात करणेत आली.
५ व्या दौऱ्यात सोमवार दि.१४/११/२०२२ रोजी सावळज- सकाळी ९ वाजता, आटपाडी -सकाळी ११-३० वाजता, जवळा (सांगोला) दुपारी ४-०० वाजता पंढरपूर -सांयकाळी ६-३० वाजता या प्रमाणे येथील मंदिराना भेटी देणेसाठी व जनसंपर्क अभियान साठी’ महाराष्ट्र कोष्टी समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष- प्रकाशराव सातपुते, रामचंद्र निमणकर सर, दिलीप भंडारे, मनोज खेतमर व इतर प्रमुख कोष्टी समाज बांधव उपस्थित होते. या करीता अध्यक्ष – दिनकरराव ऊनउने-सावळज.
-अध्यक्ष ,राज्य सचिव-किशोर ऊनउने, -रमेश टकले-आटपाडी.
-अध्यक्ष -विजयकुमार तारळकर
भास्करराव चोथे-जवळा,अध्यक्ष -भिमराव रेपाळ-पंढरपूर ,सतीश इदाते.यांनी नियोजन केले होते. या सर्व ठिकाणी समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे आमचे स्वागत केले तसेच ज्या त्या भागातील समाजाच्या समस्या मांडल्या. चर्चेत सहभाग घेतला.शिक्षित युवक ,तरुण उद्योजक ,महिला इ .साठी विविध कार्यक्रम शिखर संस्थेमार्फत घ्यावेत असे आवाहन केले.तसेच समाज विकासाच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करणेचे आश्वासन दिले. एकंदरीत या मंदिर भेटी व जनसंपर्क अभियानामुळे संपूर्ण महाराष्ट्र भर समाज बांधवांत आनंदी वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here