उरण मधील फुटबॉल पटुंसाठी आनंदाची बातमी.

 

लोकदर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 13 नोव्हेंबर २०२२उरण मधील सर्वात पहिली फूटबॉल अकॅडेमी म्हणजे सेवेन स्टार फुटबॉल अकॅडमी उरण ह्या संस्थेची स्थापना 2016 मध्ये उरण येथे झाली. ह्या संस्थेने व संस्थेचा पालक वर्गाने मिळून फुटबॉल चे अनेक टूर्नामेन्ट भरवले, ज्याचा मध्ये महाराष्ट्राचा अनेक जिल्ह्यामधून संघ सहभागी झाले. ह्याच सेवेन स्टार फुटबॉल अकॅडेमी मधून अनेक खेळाडू निर्माण झाले आहेत.जे आज अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या  स्तरावर आपला खेळ दाखवत आहेत. असेच आज ह्या संस्थेच्या मार्फत उरण चे तीन खेळाडू शिव रोहन म्हात्रे वय 9 वर्ष हा सिंगापोर येथे झालेल्या सिंगा कप 2022 साठी त्याची मुंबई तुन निवड झाली व त्याची निवड MFA मध्ये ही झाली. दुसरा पार्थ मांढरे वय 11 वर्ष ह्याची निवड MFA मध्ये झाली, तिसरी दिव्या नायक ह्या मुलीची निवड खेलो इंडिया मध्ये 17 वर्ष आतील मुलींचा टीम मध्ये रायगड मधून खेळण्यासाठी झाली. शिव रोहन म्हात्रे हा संपूर्ण रायगड जिल्ह्यामधुन् इतक्या कमी वया मध्ये इंटरनेशनल स्तरावर खेळणारा पहिला फुटबॉल पटू असावा असा सेवेन स्टार फुटबॉल अकॅडमी चे संस्थापक प्रवीण तोगरे यांनी सांगितले.उरण मध्ये चांगल्या प्रतीचे मैदान नसताना सुद्धा ही मुले मुली उरणच्या बाहेर पडून आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करून उरणचे नाव लौकिक करत आहेत ह्या गोष्टींचा प्रत्येक उरणकराला अभिमान वाटावा असाच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here