राजुऱ्यात गुरू नानक जयंती उत्साहात : आमदार सुभाष धोटे यांनी केले गुरु नानकजींना अभिवादन. ♦️गुरूद्वारा सौंदर्यीकरण व समाजभवनासाठी १० लक्ष निधी देण्याचे आश्वासन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा शहरा लगत मौजा रामपूर येथील गुरुद्वारा श्री गुरुदेव बहादुर साहिब राजुरा द्वारा शिख धर्माचे संस्थापक श्री गुरुनानक देव साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित उत्सवात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सहभाग घेऊन गुरू नानकदेव साहेबांना विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी आयोजित प्रार्थना व लंगर मध्येही आ. धोटे यांनी सहभाग घेतला.
या प्रसंगी त्यांनी सिख बांधवांशी संवाद साधला, सर्वांची ख्यालीखुशाली जानून घेतली, विविध विषयांवर चर्चा केली आणि राजुरा गुरुद्वारा कमिटी श्री गुरु तेग बहादुर साहेबजीचां गुरुद्वारा येथे समाजभवन व परिसराचे सौंदर्यीकरण यासाठी आमदार निधी अंतर्गत १० लक्ष रुपये निधी देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी हरभजन सिंग भट्टी, बकरशीस सिंग, हरपाल सिंग, जस्बीर सिंग भट्टी, रवी सिंधू, संतोष सिंग, विजयलेखराजन, मोहन चैनानी, हरजित सिंग संधू, नरेंद्र सिंग धोतरा यासह सिख धर्मीय बांधव आणि स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here