महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अॅड शिवाजी कोलते ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांची माहिती

 

लोकदर्शन सासवड, 👉राहुल.खरात.     .

दि. ८ खानवडी (ता.पुरंदर) येथे रविवार दि २७ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या १५ व्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी अॅड शिवाजी कोलते यांची निवड करण्यात आले आहे, ,अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

सासवड येथील नामांकित वकील व बांधकाम व्यावसायिक अॅड श्री शिवाजी कोलते हे पिसर्वे गावचे रहिवासी असून सासवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आहेत, यापुर्वी त्यांनी आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन, छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पद भूषविले आहे, राजकीय व सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो,
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी मराठी साहित्य संशोधन परिषद व अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते ़

सकाळी ११ वा. संमेलनाचे उदघाटन होणार असून, दुपारी २ वा. समाजसुधारक महात्मा फुले या विषयावर परिसंवाद होणार आहे, मी सावित्री बाई बोलतेय, नाट्य प्रयोग, कथाकथन, कविसंमेलन व पुरस्कार वितरण असे भरगच्च कार्यक्रम आयोजित केले आहेत ़ं

संमेलनाचे संयोजन करण्यासाठी आयोजित बैठकीला राजाभाऊ जगताप,सुनील धिवार, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड रवींद्र फुले, दत्ता होले , रमेश बोरावके, विजय तुपे, प्रा सुरेश वाळेकर, दिपक पवार, संजय सोनवणे, अमोल भेसल आदी उपस्थित होते,

 

 

 

दशरथ यादव (ज्येष्ठ साहित्यिक)

मुख्य संयोजक
महात्मा फुले प्रबोधन मराठी संमेलन
मो 9881098481

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here