धारिवाल कंपनीने सात दिवसाच्या आत मागण्या पूर्ण करा* *♦️खासदार बाळू धानोरकर यांचा धारिवाल कंपनी व्यवस्थापकाला इशारा* *♦️विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक*

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर : धारिवाल कंपनी मध्ये रोजगार, शेतकऱ्यांची नुकसानभरपाई, जलप्रदूषण, वाहतुकीचे अडथळे याबाबत सात दिवसाच्या आत सुधारणा व अमलबजावणी करण्याचा इशारा खासदार बाळू धानोरकर यांनी धारिवाल व्यवस्थापनाला दिला. आज खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे आयोजित बैठकीत विविध समस्यांवर चर्चा केली.

धारिवाल इन्फास्ट्रक्चर लिमी, ताडाली, ता. जि चंद्रपूर च्या परिसरातील नाल्यामधून प्रदूषित पाण्याने जनावरांवर गंभीर परिणाम होत असून, शेतकऱ्यांच्या शेतात दूषित पाणी, गेल्याने सन २०१६ पासून तर आजवर पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. याबाबत नुकसानभरपाई देण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.

यावेळी जिलाधिकारी विनय गौंडा, आमदार प्रतिभाताई धानोरकर, तहसीलदार चंद्रपूर, तहसीलदार कोरपना, तालुका अध्यक्ष श्याम थेरे, नंदू धानोरकर, रोशन रामटेके, आशिष देरकर, विजय बल्की यांची उपस्थिती होती.

यासोबतच खुटाळा ता. जि चंद्रपूर येथील निवासी अतिक्रमितांना हटविण्याचे नोटीस बाबत पुनर्विचार करून तोडगा काढण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या. तसेच कोरपना तालुक्यातील विशेषतः पिपळगाव, नांदा, बीबी, बाखर्डी, लखमापूर, कवठाळा येथील शेतकऱ्यांना जिल्ह्यातील इतर तालुक्याच्या तुलनेत शासकीय यंत्रणेच्या चुकीच्या सर्वेक्षणामुळे अत्यल्प नुकसानभरपाई मिळाली. याबाबत पुन्हा सर्वेक्षण करून न्याय देण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर व जिल्ह्याधिकारी विनय गौंड यांनी तहसीलदार कोरपना यांना दिल्या.

कोरपना तालुक्यात ८ हजार ६६५ बाधित क्षेत्रात १३ हजार २२४ शेतकऱ्यांना १३ कोटींचा निधी नुकसान भरपाई साठी शासनाकडून प्राप्त झाल्याचे तहसीलदार यांनी सांगितले. मात्र चुकीच्या सर्वेक्षणामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्याने या ठिकाणी पुनःसर्वेक्षनाचे आदेश देण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *