म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष ॲड. सुरेश ठाकूर , अनिल जाधव आणि संतोष पवार यांच्या युनियनच्या प्रयत्नांना मोठे यश. *♦️पनवेल महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या २९ गावातील २३ गृप ग्रामपंचायती मधील ३२० कामगारांना सेवेत कायम करण्यात आले*

 

लोकदर्शन 👉विठ्ठल ममताबादे

 

उरण दि ५नोव्हेंबर २०२२
म्युनिसिपल एम्प्लाईज युनियनचे अध्यक्ष सुरेश ठाकूर, कार्याध्यक्ष संतोष पवार आणि सरचिटणीस अनिल जाधव, मुख्य संघटक अनंत पाटील आणि युनियन चे सर्व सहकारी पदाधिकारी आणि सदस्य यांच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे . सन २०१६ साली पनवेल महानगर पालिकेत अनेक ग्राम पंचायतींचा समावेश करण्यात आले.परंतु ते कर्मचारी कायम करण्यास तत्कालीन महानगर पालिका आयुक्त सुधाकर शिंदे न्हवते तर सर्व कामगारांना ठेकेदारा मार्फत वेतन घेण्यासाठी दबाव आणला जात होता. परंतु कामगार कायद्याचा सखोल अभ्यास असणारे आणि सामान्य माणसाच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असलेले एडव्होकेट सुरेश ठाकूर यांनी योग्य प्रकारे प्लॅनिंग केले . कायदेशीर लढाई आणि रस्त्यावरची लढाई असे दोन्ही मार्ग अवलंबले. मुंबई येथे मंत्रालयावर जवळ जवळ दहा हजार लोकांचा पायी मोर्चा काढला. आणि प्रशासनाला दणका दिल्यावर जाग आली. पहिल्या टप्प्यात १०५ +१८३ कर्मचारी आणि दुसऱ्या टप्प्यात आता शवटचे ३२ कर्मचारी असे एकूण ३२० कर्मचारी कायम करण्यात यशस्वी झाले. या सर्व प्रक्रिये मध्ये मंत्रालयीन पातळीवरील तसेच एकी टिकण्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आणि युनियनचे सरचिटणीस संतोष पवार आणि कार्याध्यक्ष अनिल जाधव , अनंत पाटील , सुधाकर पाटील, प्रा. राजेंद्र मढवी , युनियन चे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांनी त्यांना सदैव साथ दिली. यामध्ये वेळोवेळी यथायोग्य मार्गदर्शन सध्याचे पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी देखील केले आहे. उशिरा का होईना पण योग्य निर्णय मा. महाराष्ट्र शासनाने घेतल्या बद्दल महाराष्ट्र शासनाचे आणि महानगर पालिका प्रशासनाचे मुनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्त्यांनी जाहीर आभार मानले आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *