



,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
लोकदर्शन पुणे 👉 प्रा. अशोक डोईफोडे
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त नीती निकेतन शिक्षण संस्था संचालित मातोश्री रेवम्मा मुलींचे खुले निवारागृहा मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बसवेश्वर द्याडे होते मातोश्री रेवम्माचे सचिव गोदावरी द्याडे मॅडम तसेच जयश्री भारती मॅडम उपस्थित होत्या, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन ध्याडे साहेब व गोदावरी मॅडम यांच्या हस्ते अनाथ मुलींना खाऊ वाटप केले सामाजिक कार्यकर्त्या पत्रकार स्नेहा मडावी यांनी संस्थेला आपल्या स्वखर्चाने अनाथ मुलींना व फूट पाथवर राहणाऱ्याना मदत करत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अतिथीची भाषणे झाली. तसेच भीम गीत गायन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घ्यावा असा संदेश द्याडे साहेबांनी दिला. यावेळी संस्थेतील कर्मचारी वनिता रणदिवे, सोनाली बनसोडे, प्राजक्ता थोरात, दीपिका आलगुले उपस्थित होत्या.
,,फोटो,,