राजर्षी शाहुंचा विचार माणसं जोडणारा : मा. ना. जितेंद्र आव्हाड

लोकदर्शन 👉महेश्वर तेटांबे
सिने-नाट्य दिग्दर्शक,पत्रकार
9082293867

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : राजर्षी शाहू महाराज हे जनतेचे राजे होते. सर्वसामान्य रयत त्यांच्यासाठी महत्वाची होती. त्यांना सतत दुबळ्या माणसांची बाजू घेतली. न मागता जगात आरक्षण देणारे ते पहिले राजे होते. त्यांचे विचारच मुळात माणसं जोडणारे होते असे प्रतिपादन मा. ना. जितेंद्र आव्हाड यांनी केले. ते कोल्हापूर येथिल निर्मिती विचारमंचच्या वतीने आयोजित लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराज यांचा विचारांचा जागर करण्यासाठी राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे राज्यस्तरीय राजर्षी शाहू विचार संमेलनात बोलत होते. पुढे ते म्हणाले, आजच्या राजकीय लोकांनी शाहुंचा वापर फक्त राजकारणासाठी करू नये. त्यांनी राबवलेली धोरणे समजून घेऊन देशविकासासाठी काम करावे. या संमेलनास महाराष्ट्रातून एक हजारहून अधिक शाहू प्रेमी उपस्थित राहणार होते. इतिहास संशोधक प्रा. डॉ. कपिल राजहंस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री मा. ना. जितेंद्र आव्हाड यांनी संविधानाची प्रास्ताविका वाचन करून केले.
सकाळी दहा पासून सुरु झालेल्या संमेलनात पहिल्या सत्रात निर्मिती फिल्म क्लब निर्मित… सलाम संविधान हा प्रबोधनपर गाण्यांचा संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात निवेदिका साक्षी चोथे यांच्यासह चंद्रनील सावंत, सानिका नाकील, अनुष्का माने, आदित्य बल्लाळ, माऊली गावडे, राधिका पाटील, ओंकार सुतार आदी कलाकार सहभागी झाले होते.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजीव आवळे, संमेलनाचे मुख्य निमंत्रक निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने, प्रा. डॉ. शोभा चाळके-म्हमाने सहनिमंत्रक धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या ॲड. करुणा विमल, अब्राह्मबापू आवळे, राहुल आवळे, ॲड. अधिक चाळके, राहुल राजहंस यांच्यासह मोठया संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. कपिल राजहंस यांनी संपादित केलेल्या एक हजार हुन अधिक पानांच्या सर्वव्यापी शिवराय या ग्रंथाचे प्रकाशन मा. ना. जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले तर निर्मिती प्रकाशनाच्या प्रकाशिका, कवयित्री, लेखिका डॉ. शोभा चाळके यांनी शिवाजी विद्यापीठाची इंग्रजी विषयातील पीएच. डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
संमेलनात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ व भारतीय संविधानाचे अभ्यासक डॉ. श्रीपाद देसाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भरत लाटकर, ज्येष्ठ कवयित्री व लेखिका डॉ. स्मिता गिरी, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी अनंत हावळ यांना राजर्षी जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
स्वागत अनिल म्हमाने, प्रास्ताविक राजीव आवळे यांनी तर सूत्रसंचालन वैभव प्रधान यांनी केले आभार साक्षी चोथे यांनी मानले.

महेश्वर तेटांबे

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *