पनवेल बस आगार समस्या संदर्भात पुकारलेल्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे उरण सामाजिक संस्थाचे आवाहन.

 

लोकदर्शन 👉 विठ्ठल ममताबादे

 

उरण दि 2 नोव्हेंबर 2022
‘प्रवासी संघ पनवेल ‘ या संस्थेतर्फे पनवेल एसटी स्थानकाचे रखडलेले बांधकाम तातडीने सुरू करण्यात यावे या मागणीसाठी गुरूवार दि. 03 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून पनवेल एसटी स्टॅन्ड (बस आगार )येथे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे .
पनवेल एसटी स्टैंडच्या उभारणीचे काम मागील काही वर्षांपासून रेंगाळलेले आहे .
वस्तुत: पुणे – गोवा मार्गावरील हे अत्यंत महत्वाचे स्थानक आहे. संपूर्ण रायगड जिल्हाही या स्थानकाला जोडलेला आहे. त्यामुळे हे स्थानक प्रवाशांनी सदैव गजबजलेले असते .
या पार्श्वभूमीवर सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा पनवेल स्थानकाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करणे गरजेचे होते . परंतु त्या अभावी मागील 5-6 वर्षांपासून प्रवाशांची अक्षम्य गैरसोय होत आहे . हजारो प्रवाशांना ऊन पावसात उभे रहावे लागत आहे .उरणच्या प्रवाशांनाही ही समस्या भेडसावत आहे . एकतर एसटी बसेस वेळेवर येत नाहीत . तशातच स्थानकात बसण्याची सोय नसल्यामुळे आबाल वृद्ध , महिला, विद्यार्थ्यांना तास न तास उभे राहून एसटीची प्रतिक्षा करावी लागते . ही समस्या गंभीर स्वरूपाची आहे. म्हणून या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रवासी संघाने सनदशीर मार्गाने आंदोलनाचे आवाहन केले आहे . हा प्रश्न उरणकरांच्याही रोजच्या जीवनाशी निगडित आहे . तरी दि. 3 नोव्हेंबर 2022 च्या आंदोलनासाठी उरणकरांनी सकाळी 10 वाजता पनवेल एसटी स्टॅन्ड (बस आगार )येथे उपस्थित रहावे असे आवाहन उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here