



लोकदर्शन प्रतिनिधी 👉स्नेहा उत्तम मडावी
दि ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी शिवाजी मंदिर, मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान मुंबई आणि कला व सांस्कृतिक संचालनालय, गोवा सरकारच्या वतीने भोसरी येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप राक्षे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल “महाराष्ट्र गोवा एकता सामाजिक कृतज्ञता पुरस्कार” गोवा राज्याचे ग्रामविकास व कला, क्रीडा व सांस्कृतिक मंत्री गोविंदराव गावडे यांच्या शुभहस्ते देण्यात आला यावेळी अभिनेते विजय पाटकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक संचालनालयाचे समन्वयक भालचंद्र उसगावकर यांनी केले होते..