जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी.

उरण :(विठ्ठल ममताबादे )


आत्माराम ठाकूर मिशन संचालित जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे ( इंग्लिश मीडियम ) येथे शाळेचे अध्यक्ष अशोक ठाकूर आणि मुख्याध्यापिका कांचन थळी यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात करण्यात आली.शिक्षक, पालक संघातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विठ्ठल रखुमाई मंदिरासमोर वारकरी नृत्य केले.तसेच प्रत्येक ग्रामस्थांनी पालखीचे आशीर्वाद घेतले. रॅलीत सर्व विद्यार्थ्यांनी भजन गायले. जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कूल आवरे येथे आषाढी एकादशीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *