भेंडखळ येथे आषाढी एकादशी कार्यक्रम मोठया भक्ति भावात साजरा.

उरण : (विठ्ठल ममताबादे )पांडूरंगाच्या भक्तांना आषाढ महिना सुरू झाला की ओढ लागते ती पंढरिच्या वारिची आणि श्री विठु माऊलीच्या दर्शनाची. संपुर्ण महाराष्ट्रातील पंढरी नगरी जशी नाळ मृदूंगाच्या आणि टाळ विणाच्या भक्तिमय वातावरणात दुमदुमली आहे तसेच मनमोहक दृष्य प्रतिपंढरपुर समजल्या जाणा-या उरण तालुक्यातील भेंडखळ येथे श्री. विठ्ठल रखमाई मंदिरामध्ये पाहावयास मिळाले.संपुर्ण उरण तालुक्यातुन आलेल्या भक्त व भाविकांच्या लांबच लांब रांगा प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिर भेंडखळ येथे पहावयास मिळाले.

अगदी पहाटे पासुन शिस्तबध्द कार्यक्रमांचे आयोजन श्री विठोबादेव देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतिने आणि ग्राम पंचायत कार्यालय भेंडखळ तसेच ग्रामस्थ मंडळ भेंडखळ च्या वतिने आयोजित करण्यात आले होते.

पहाटे ४ वाजता काकडा, ५:३० वाजता अभिषेक, ६:०० वाजता आरती, सकाळी ८:०० वाजता प्रदक्षिणा दिंडी, सकाळी १० वाजता श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ यांचे भजन, सायकाळी ०५:०० वाजता श्री संत जनाबाई हरिपाठ मंडळाचे भजन, सायंकाळी ०७:०० वाजता श्री ठाणकेश्वर प्रासादिक भजन मंडळाचे भजन, रात्री ०९:०० वाजता न्यु ठाणकेश्वर मंडळाचा सुर संगिताचा कार्यक्रम इत्यादी कार्यक्रमाने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते.

कोरोणा काळात २ वर्षे आषाढी एकादशी कार्यक्रमाचे आयोजन करता आले नसल्यामुळे हिरमुसले झालेले भक्तगण तसेच माऊली माऊली म्हणत डोईवर तुळसवृंदावन घेऊन हरिनामाच्या जयघोषात तल्लीन झोलल्या माऊल्या आज शेकडोंच्या संख्येने दिंडीमध्ये पहावयास मिळाल्या.छोटे छोटे बच्चे कंपनी विठूरायाच्या आणि रखुमाईच्या वेषात उपस्थित होते.तर खुप सा-या भक्तांच्या नजरा आपल्याकडेच खिळवून ठेवत असल्याचे चित्र आज माऊलीच्या दिंडीत प्रत्यक्ष पहावयास मिळाले.

पहाटे पासुन ते रात्री पर्यंत सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी श्री. विठ्ठल रखुमाई देवस्थान ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष उध्दव नामदेव घरत तसेच उपाध्यक्ष देवानंद ठाकूर,रमेश ठाकूर, बळीराम भोईर,नरेश म्हाञे,भारत ठाकूर,अरूण म्हात्रे, नासिकेत म्हात्रे, नरेंद्र भगत, विजय भोईर, परशुराम भोईर, सुर्यकांत ठाकूर, किशोर ठाकूर यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. विषेश सहकार्य लक्ष्मण भास्कर ठाकूर यांचे लाभले होते.तसेच मंदिर फुलांची आरास सजावट गजानन तुलशिराम ठाकुर यांच्या मार्फत करण्यात आली होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *