भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने नांदा पंचायत समितीची बैठक संपन्न

लोकदर्शन 👉मोहन भारती

⭕ पक्ष संघटन मजबूत करा तालुका अध्यक्ष श्री नारायण हिवरकर यांचे आव्हान

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने नांदा पंचायत समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष अध्यक्ष कोरपना तथा जिल्हा उपाध्यक्ष प्रमुख पाहुणे श्री सतिशभाऊ उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर तथा विस्तारक, श्री संजयभाऊ मुसळे माझी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष,श्री पुरुषोत्तमजी निब्रड सर शक्ती केंद्र प्रमुख,श्री पुरुषोत्तमजी अस्वले शक्ती केंद्र प्रमुख,श्री आबाजी पा बोबडे,श्री लहुजी गोंडे माजी उपसरपंच,श्री शत्रुघनजी शेडमाके शक्ती केंद्रप्रमुख,श्री देशमुख साहेब,श्री वामन पाटील गानफाडे आदि मान्यवर उपस्थित होते श्री सतीश उपलंचिवार यांनी आपल्या मनोगतात शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख,बुथ प्रमुख,पेज प्रमुखां बद्दल सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच श्री नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पक्ष संघटन कशाप्रकारे मजबूत होईल याबद्दल माहिती दिली व पक्षाच्या कामात सर्वांनी जोमाने कामाला लागावे व बूथ प्रमुख श्री पुरुषोत्तमजी निब्रड सर व पुरुषोत्तमजी अस्वले यांना नेमप्लेट देण्यात आल्या व शक्ती केंद्रप्रमुख,बुथ प्रमुख, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करावे असे आवाहन केले कार्यक्रमाला भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन संजय भाऊ मुसळे यांनी केले तर आभार आबाजी बोबडे यांनी मानले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *