Home
Home गडचांदूर / कोरपणा महात्मा गांधी विद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

महात्मा गांधी विद्यालयात राजश्री छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
थोर समाजसुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापिका तथा प्राचार्या सौ.स्मिताताई चिताडे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य विजय आकनूरवार,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा अशोक डोईफोडे, होते.
सर्वप्रथम राजश्री शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपप्राचार्य विजय आकनूरवार,यांनी प्रास्ताविक मधून राजश्री शाहू महाराजांच्या जीवन चारित्र्य वर प्रकाश टाकला.
संचालन प्रा नंदाताई भोयर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा नितीन वाढई यांनी केले.
याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here