जे एम म्हात्रे चँरिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेची 100% निकालाची परंपरा सलग चौथ्या वर्षीही कायम

 

लोकदअर्शन👉विठ्ठल ममताबादे

उरण दि 22 जून
जे.एम.म्हात्रे चारिटेबल संस्थेचे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडियम स्कूल,वेश्वी शाळेचा इयत्ता दहावीचा बोर्डाचा 2021-22 वर्षाचा एकूण निकाल सलग चौथ्या वर्षीही 100 % एवढा लागला. कुमारी सिमरन विलास मुंबईकर 88.40% गुण मिळवून प्रथम तर कुमारी सलोनी समीर पाटील 88.00% गुण मिळवून द्वितीय तसेच कुमारी श्रेया रणधीर घरत 87.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.शाळेच्या एकूण निकालामध्ये 21 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 32 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जे.एम.म्हात्रे,संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रितम शेठ म्हात्रे ,संस्थेचे सचिव जे.के मढवी ,शाळा समितीचे चेअरमन चंद्रकांत मुंबईकर,शाळेचे मुख्याध्यापक प्रितम टकले यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *