Home
Home गडचांदूर / कोरपणा इन्फंट कान्व्हेंट येथे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन.

इन्फंट कान्व्हेंट येथे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन.

लोकदर्शन👉मोहन भारती

राजुरा :– इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी योगदिनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल राजुराचे मुख्याध्यापक रफिक अन्सारी, रामचंद्रराव धोटे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रफुल्ल शेंडे, उमेश लढी, सुभाष पिंपळकर, विद्या चौधरी, रेश्मा शेख, पुंडलिक वाघमारे, नेहा बसेशंकर यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध योग प्रात्यक्षिके सादर करून योगदिन साजरा केला.
या प्रसंगी योगदिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वंशिका कटरे हिने तर सुविचार कु. श्रृष्टी खोके हिने सांगितले. कु. ईषा बिस्वास, कु. काव्या चौधरी, कु. मानसी घुग्गुल, कु. सक्षम चौधरी, कु. गौरी दिवसे, कु. ईषिका राठोड, कु. मनश्री इटणकर या विद्यार्थ्यांनी विविध योग प्रात्यक्षिके सादर केलीत. यात शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here