महात्मा गांधी विद्यालयात जागतिक योग दिवस साजरा

 

लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्राचार्या स्मिताताई चिताडे होत्या. योग प्रशिक्षक शारीरिक शिक्षक बबन भोयर यांनी मानवी जीवनात योगाचे महत्त्व पटवून दिले व प्रात्यक्षिक करून दाखवले,उपस्थित सर्व शिक्षकानी योगासने केली.
याप्रसंगी उपप्राचार्य विजय आकनूरवार,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच बी मस्की, एम सी व्ही सी विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे,शारीरिक शिक्षक प्रा प्रशांत पवार,संजय झाडे,अमोल शेळके,तथा इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *