खिर्डी आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मंगला पंधरे अविरोध


By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
कोरपना : कोरपना तालुक्यातील खिर्डी आदिवासी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक दि. ८ जूनला पार पडली. अध्यक्षपदी काँग्रेसच्या मंगला पंधरे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे रामचंद्र कुळमेथे अविरोध निवडून आले आहेत.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर धोटे, विजय बावणे यांच्या नेतृत्वात ही निवडणूक पार पडली. यावेळी सर्व संचालक पद्माकर मडावी, राजेंद्र मडावी, भीमा सिडाम, बापूजी सलाम, सुभाष कोडापे, कमलाकर देरकर, गुलाब जीवतोडे, उद्धव लिपटे, सुरेश राऊत, अशोक आस्कर, मंगला येरमे आदी संचालक व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *