नवे ‘कोलामार्का’ अभयारण्य

By : Shankar Tadas
लोकदर्शन👉
गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या टोकावरील आणि छत्तिसगढ़- तेलंगाना- महाराष्ट्र सीमेवर कोलामार्का ‘रानम्हसीचे’ अधिवास क्षेत्र आता “अभयारण्य” होणार आहे.
राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाच्या बैठकीत याबाबतचा निर्णय नुकताच झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्क संवर्धन राखीव क्षेत्रात रानम्हशीच्या संवर्धनास विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय राज्य वन्यजीव मंडळाच्या 12 व्या बैठकित घेण्यात आला होता. आज 18 व्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत अभयारण्य घोषित करण्यात आले. याबद्दल मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे व सर्व SBWL सदस्यांचे मनःपूर्वक आभार.

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर परिसरात दहा-बारा रानम्हशी होत्या. आता ही संख्या निच्छित वाढली आहे. मध्य भारतातील पन्नास टक्के पेक्षा अधिक या तिन्ही राज्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या ‘कोलामार्का’ वनक्षेत्रात दिसून येतात. याचे संवर्धन स्थानिकांच्या सहभागातून करण्यात येत असून, सर्वाधिक चर्चेच्या कमलापुर हत्ती कैम्प लगतचे हे क्षेत्र आहे. कमलापुर येथील हत्ती स्थानांतरण न करता याचाही विकास करण्याची आवश्यकता आहे. यामुळे परिसर मधील पर्यटन विकसाला चालना मिळत असून येत्या काळात कोलामार्का आणि कमलापुर दुर्गम, नक्षलग्रस्त गडचिरोली चे रूपडे बदलन्यास मैलाचा दगड ठरतील.
*******
बंडू धोतरे, सदस्य SBWL व अध्यक्ष, इको-प्रो
यांची फेसबुक पोस्ट

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *