शिंदे – फडणवीस सरकारने जाहिर केलेले आनंद शिधा त्वरित वाटप करा. शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने करणार

 

लोकदर्शन 👉 मोहन भारती
*●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●*
*सोलापूर दिनांक :- २१/१०/२०२२ :-* महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने जाहिर केल्याप्रमाणे दिवाळी रेशन पॅकेज त्वरित वाटप करा. अन्यथा शिवसेना अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निदर्शने करणार असल्याचे असा इशारा वजा निवेदन सोलापूर शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे व शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
मा. जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आलेल्या निवेदनात राज्यातील युती (शिंदे – फडणवीस) शासनाने गोर – गरीब जनता व सर्वसामान्य रेशनधारकांना दिवाळी सनानिमित्त 100 रुपये मध्ये तेल, हरभरादाळ, साखर व रवा या चार जिवनाश्यक वस्तू वाटप करणार असल्याचे जाहीर केले. परंतु दिवाळी सन सुरूवात झाली तरीही कोतत्याही रेशन दुकानात अद्यापही रेशनकार्ड धारकांना पॅकेजचे धान्य दिले नाही. म्हणजेच गरीब रेशन कार्डधारकांचे राज्यातील श्री. एकनाथ शिेंदे व देवेंद्र फडणवीस यांची युती सरकार साफ फसवणुक केल्याचे दिसून येते. या कृत्याचा सोलापूर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत.
तरी माननीयांनी शासनांनी जाहीर केल्या प्रमाणे रेशनकार्ड धारकांना सरसकट धान्य पॅकेज ताबडतोब वाटप करावे अन्यथा सोलापूर शिवसेनेच्या वतीने रस्तयावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्यावेळी होणाऱ्या परिणामास सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार राहील. याची गांभीर्याने नोंद घ्यावी. असे नमुद करण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलतांना पुरूषोत्तम बरडे म्हणाले की, महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकार हे प्रसिध्दीसाठी दिवाळी कार्डधारकांना आनंद शिधा वाटप करण्याचे जाहिर केले. परंतु प्रत्यक्षात नियोजन शुन्य यंत्रणा व गरिबांची चेष्टा करण्याचे प्रकार या योजनेव्दारे केले आहे. म्हणुन शिवसेना लवकरात लवकर आनंद शिधा वाटप करण्याचे मागणी करत आहे. असे म्हणाले. आणि शहरप्रमुख विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी बोलताना म्हणाले की, आनंद शिधा योजना जाहिर करून गरिब लोकांची फसवणुक केली आहे. याचा बदला जनता नक्कीच घेणार असे म्हणाले.
मा. जिल्हाधिकारी यांना पुरुषोत्तम बरडे व विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, भिमाशंकर म्हैत्रे, संतोष पाटील, दत्तोपंत वानकर, समन्वयक अतुल भंवर, भैय्या धाराशिवकर, विजय पुकाळे, उपशहरप्रमुख रेवण पुराणिक, रेवण बुक्कानुरे, सचिन गंधुरे, अमित भोसले, अनिल कोंडुर, धनराज जाधव, बालाजी विटकर, दिपक गवळी, आलाश कोळी, अजय खांडेकर, संदिप म्हैत्रे, अभिषेक चिलका, गुरूनाथ कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. *

●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆*
*फोटो मॅटर :- सोलापूर शिवसेनेच्या वतीने आनंद शिधा पॅकेज त्वरित वाटप करा. या मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी क्षमा पवार यांना देतांना पुरूषोत्तम बरडे, विष्णु कारमपुरी (महाराज), प्रताप चव्हाण, भय्या धाराशिवकर, दत्ता वानकर, भिमाशंकर म्हैत्रे, अतुल भंवर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *