महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने 1 मे रोजी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २९/०४/२०२२ :-* शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने १ मे रोजी कामगार दिनाचे, जागतिक कामगार दिनाचे व महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडा वंदन कार्यक्रम व महिला विडी कामगारांना शिवबंधनाचा कार्यक्रम त्याचबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे.
शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने १ मे या जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी १० वाजता महाराष्ट्र कामगार सेना कार्यालय पद्मशाली चौक येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम, महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते व महाराष्ट्र कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता तालुका दक्षिण सोलापूर मौजे कुंभारी येथील माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहतीत माँ साहेब सभागृह येथे स्थापित करण्यात आलेल्या स्वर्गीय हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या मुर्तीचे पूजन करून अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहतीतील रहिवासी सर्व महिला विडी कामगारांना शिवबंधनाचा कार्यक्रम होणार आहे. या दोन्ही कार्यक्रमास माँ साहेब विडी कामगार घरकुल वसाहतीतील सर्व कामगार बंधू – भगिनी व झेंडावंदन कार्यक्रमास कामगार सेना कार्यालयाजवळ सर्व कामगार बंधू – भगिनी प्रामुख्याने विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार, घरेलू कामगार,J शेतमजूर कामगार या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आव्हान महाराष्ट्र कामगार सेनेचे उपाध्यक्ष श्रीनिवास चिलवेरी व सेक्रेटरी विठ्ठल कुऱ्हाडकर यांनी केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *