निराधार योजनेचे पैसे मिळवुन देते म्हणुन एका विधवा महिलेचे सवतीनेच केले फसवणुक.*

*लोकदर्शन 👉 मोहन भारती

*सोलापूर दिनांक :- २९/०४/२०२२ :-* ता. मोहोळ देगांव येते राहणाऱ्या श्रीमती चित्रा विनायक आतकारे यांचे पती कै. विनायक आतकारे हे नदीच्या प्रवाहातील पाण्यात बुडून मेल्याने नैसर्गिक आपत अनुदानाचे मिळालेले पैसे खोटी कागदपत्र तयार करून सवत (दुसरी पत्नी) तारामती विनायक आतकरे व त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करून शासकीय मदतीचे पैसे लाटले असून ते पैसे मला मिळवून द्यावे व त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चित्रा आतकरे यांनी मोहोळचे तहसीलदार यांना केली आहे.
याबाबतची तक्रार श्रीमती चित्रा आतकरे यांनी कामगार सेना कार्यालयात न्याय मिळवून देण्यासाठी तक्रार केली. त्यावरून महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी थेट मोहोळचे तहसीलदार श्री. प्रशांत बेडंसे पाटील साहेब यांची भेट घेऊन वरील बाबी न्याय मिळवून देण्याची मागणी केली. आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात मी विनायक कृष्णा आतकरे यांची कायदेशीर पहिली पत्नी असुन सदर विनायक कृष्णा आतकरे यांचा दि. ०७/१०/२०२१ रोजी मौजे देगाव (वा) येथील नदीतुन आपले शेतजमीनीत विनायक कृष्णा आतकरे नदीच्या पाण्याच्या प्रवाहातुन जात असताना अती पाण्याच्या प्रवाहात बुडाल्याने मृत्यु झालेला असुन त्याबाबत आपल्या कार्यालयाने सदर मृत्युबाबत आपल्या कार्यालयाने प्रत्यक्ष शहानिशा करुन पंचनामा करुन नैसर्गिक आकस्मीक आपत्ती शासकीय योजनेतुन मदत जाहिर केलेली असुन सदर आपले कार्यालय विनायक कृष्णा आतकरे यांचे वारसास शासकीय योजनेतुन मदत देत आहेत. परंतु मी त्यांचे कायदेशीर पत्नी असताना सदर मयत विनायक कृष्णा आतकरे यांची दुसरी पत्नी तारामती विनायक आतकरे व तिचे अपत्ये कोमल विनायक आतकरे, प्रथमेश विनायक आतकरे, प्रविण विनायक आतकरे अशी वारस दाखवुन सदरची रक्कम मला न देता माझी कोणतीही संमती न घेता माझ्या परस्पर आपल्या कार्यालयाकडे आम्हीच फक्त वारस आहेत. अशी दिशाभुल करुन सदर शासकीय नैसर्गिक आकस्मीक मयत निधी अबलास करण्याच्या प्रयत्नात आहेत.
तरी सदरची रक्कम माझ्या कायदेशीर हक्काची व अधिकाराची रक्कम असुन माझ्या पुर्व संमतीशिवाय मयत विनायक कृष्णा आतकरे यांना मिळणारी शासकीय नैसर्गिक, आकस्मीक आपत्ती निधीची रक्कम या आर्जात नमुद केलेल्या अन्य व्यक्तीस देवु नये. तसेच मयत विनायक कृष्णा आतकरे यांना अन्य कोणतीही आपल्या शासकीय योजनेची रक्कम म्हणजेच गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना तसेच अन्य कोणताही मदत निधी माझ्या पुर्व संमतीशिवाय या अर्जातील नमुद व्यक्तीस देवु नये. सदरची मयत विनायक कृष्णा आतकरे यांच्या मयत निधी संदर्भात शासकीय योजनेतुन मिळणारी रक्कम पुर्णत: माझ्या कायदेशीर हक्काची व अधिकाराची असुन सदरची रक्कम मला कायदेशीर पत्नी या नात्याने मिळावी ही विनंती. असे नमुद करण्यात आले.
मा. तहसीलदार श्री. प्रशांत बेडंसे पाटील साहेबांना विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली निवदेन देणाऱ्या शिष्ट मंडळात अन्यायग्रस्त महिला श्रीमती चित्रा आतकरे, सुभाष घोडके, सावित्रा घोडके, गुरुनाथ कोळी यांचा समावेश होता.
मा. तहसीलदार साहेबांना निवेदन स्विकारल्यानंतर तात्काळ या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश मंडलाधिकाऱ्यांना दिली. ****************************** *********फोटो मॅटर :- चित्रा आतकरे यांना झालेल्या फसवणुकीबाबत मोहोळचे तहसिलदार श्री. प्रशांत बेडंसे पाटील साहेबांना निवेदन देताना विष्णु कारमपुरी (महाराज), चित्रा आतकरे, सुभाष घोडके, सावित्रा घोडके आदि दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *