8 मे रोजी डोंबिवली येथे वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीचा वधु-वर मेळावा.

 

लोकदर्शनउरण 👉 (विठ्ठल ममताबादे)

दि 29 एप्रिल दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी महाराष्ट्र वीरशैव सभा ठाणे जिल्हा व वीरशैव लिंगायत सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत धर्मातील सर्व पोट जातीतील इच्छुक वधुवरांसाठी रविवार दि 8 मे 2022 रोजी सर्वेश मंगल कार्यालय, ताई पिंगळे चौक, डोंबिवली(पूर्व),(डोंबिवली रेल्वे स्टेशन पासून 5 मिनिटाच्या अंतरावर )येथे वधुवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

वीरशैव लिंगायत समाजातील सर्व जाती पोटजातीतील तसेच जंगम समाजातील बंधु भगिनींणी आपल्या उपवर मुला/मुलींसोबत हजर रहावे. कार्यक्रमाची नोंदणी 11 ते 1 या वेळेत मेळाव्याच्या ठिकाणीच होईल. व लगेचच दुपारी 1 वाजता मेळावा सुरु होईल. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी अध्यक्ष शांतकुमार लच्याने फोन नंबर -7719822994, उपाध्यक्ष बसवंतराव.डी. अळगी -9664142412, कार्याध्यक्ष प्रदीप निलाखे -9833589773 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने तसेच उरण तालुक्यातील लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *