इन्फंट कान्व्हेंट येथे पालक – शिक्षक संघ सभा आणि बक्षिस वितरणाचे आयोजन.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕इन्फंट कान्व्हेंट बेस्ट स्कूल अवॉ २०२१ ने सन्मानित. ऊद्या

राजुरा :– इन्फंट जीसस सोसाइटी राजूरा द्वारा संचालित इन्फंट जीसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल येथे पालक – शिक्षक संघाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून अखिल भारतीय नागरिक संघ औरंगाबाद यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
अखिल भारतीय नागरिक संघ औरंगाबाद तर्फे चित्रकला स्पर्धा, सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन दिनांक ७, ८ व ९ डिसेंबर ला करण्यात आले होते. या स्पर्धांचा निकाल आज दिनांक २० एप्रिल ला जाहीर करण्यात आला. यात शाळेतून एकूण ३६६ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता. त्यात इन्फंट शाळेला बेस्ट स्कुल अवार्ड २०२१ देण्यात आला. तसेच कला रत्न पुरस्कार २०२१ कुमारी अरुंधती नंदकिशोर कलपल्लीवार (वर्ग १ला ), सिद्धांत संजय वाघमारे (वर्ग ३), तहझीम सलीम शेख (वर्ग 7 वा), तनिष्का सुनील मेश्राम (वर्ग ८), कलाश्री अवॉर्ड 2021 प्राची प्रदीप कुमारब राठोड( वर्ग ४), ज्ञानेश्वरी नवनाथ उरकुडे (वर्ग ७), सौंदर्या वामन आत्राम (वर्ग १०),
विद्या भूषण अवार्ड 2021 श्रुती नितीन निमसरकार (वर्ग १०) यांना प्रदान करण्यात आले. तसेच बेस्ट टिचर अवॉर्ड 2021 मिसेस चानी एस. तेलंग तर बेस्ट प्रिंसिपल अवॉर्ड 2021 मिसेस सिमरनकौर भंगू यांना देण्यात आला.
या प्रसंगी सर्व यशस्वी स्पर्धकांना इन्फंट जिजस सोसायटीचे संचालक अभिजीत धोटे ,पेरेंट्स टीचर असोसिएशनचे व्हॉईस प्रेसिडेंट गोविंद चव्हाण, जॉइंट सेक्रेटरी बादल बेले यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी बोलताना मान्यवरांच्या तर्फे सर्व विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. या स्पर्धांचे आयोजन ऍक्टिव्हिटी इन्चार्ज टीचर निता न्यालेवार, रेशमा अहमद, शोएब शेख, चानी तेलंग, प्रतिभा चुन्ने , राम मेडपल्लिवार , विद्या तेलंग, आणि सर्व वर्ग शिक्षक आणि शिक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन मेघा धोटे तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शोएब शेख यानी केले. या कार्यक्रमात मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्यध्यापक रफीक अंसारी, पालक शिक्षक संघाचे सदस्य, सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिति होती. पुरस्कार प्राप्त सर्व विद्यार्थी व शिक्षक वृंदांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे यांनी अभिनंदन केले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *