खासदारांनी पदाच्या अहंकाराऐवजी गरीमा जोपासावी – हंसराज अहीर

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

चंद्रपूर – चंदपूर जिल्ह्याच्या खासदारांनी भद्रावती येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाशी गैरवर्तणूक केल्याने पोलिसांनी त्यांचेवर गुन्ह्याची नोंद केल्याचे कळते. सदर प्रकार हा लोकशाही मुल्यांना पायदळी तुडविणारा आहे. एका कनिष्ठ कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधकडून हल्ला, शिविगाळ व धमकीसारखा प्रकार निषेधार्ह असून निंदास्पद आहे असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून अशाप्रकारच्या वर्तणूकीची अजिबात अपेक्षा नाही. पदाच्या अहंकाराऐवजी पदाची गरीमा जोपासावी तसेच सार्वजनिक कार्यातून हेे दाखविण्याऐवजी एका कनिष्ठ कर्मचाऱ्यास धमकी देण्यात स्वारस्यमानणाऱ्या वृत्तीचा सर्व स्तरीय निषेध होणे गरजेचे असल्याचेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *