टॉयलेटमध्येही मोबाइल घेऊन जाता? मोबाइल बाहेर असेल तर रेस्टलेस होता? ही सवय घातक, कारण..

 

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

टॉयलेटमध्ये असणाऱ्या जंतूंमुळे विविध आजार होण्याची शक्यता असतेच. पण इतका सतत मोबाइल वापरणे मानसिक आरोग्याच्या दृष्टीनेही घातक ठरु शकते. त्यामुळे आरोग्याला बरेच अपाय होऊ शकतात….

अपचन, पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाशी निगडीत तक्रारी उद्भवतात. त्यामुळे टॉयलेटला जाताना सोबत मोबाइल न नेलेलाच केव्हाही चांगला.
टॉयलेटमध्ये मोबाइल घेऊन जाणे ही सवय अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते.
मोबाइल फोन हा सध्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. आपण दिवसभरातील जितका वेळ जागे असतो तेवढा जवळपास सगळा वेळ आपल्या हातात मोबाइल असतोच. कधी कामाच्या निमित्ताने तर कधी सोशल मीडियावर सर्फींग करण्यासाठी नाहीतर मनोरंजन म्हणून वेबसिरीज किंवा अन्य काही पाहण्यासाठी आपल्याला सतत मोबाइल लागतो. कित्येक जणांना गाडी चालवताना, जेवताना किंवा अगदी कोणतेही काम करताना सतत हातात मोबाइल लागतो. इतकेच नाही तर अनेकांना या मोबाईलचे इतके वेड असते की आंघोळीला किंवा टॉयलेटला जातानाही ते फोनशिवाय राहू शकत नाहीत. मात्र असे करणे आरोग्याच्या दृष्टीने अजिबात चांगले नाही. मोबाइलचे इतके वेड असणे हे मानसिक आरोग्यासाठीही अजिबात चांगले नाही. तसेच मोबाईल टॉयलेटमध्ये नेल्याने आरोग्याच्या कोणत्या तक्रारी उद्भवू शकतात याविषयी…

१. एका सर्वेक्षणातून असे लक्षात आले आहे की अनेक मोबाइल टॉयलेटमध्ये नेणे सर्वाधिक धोकादायक ठरू शकते. यामध्ये मोबाइल कमोडमध्ये पडण्याची भिती असतेच पण यामुळे तुमच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. शौचायल ही सर्वाधिक अस्वच्छ जागा असते. डोळ्यांना न दिसणारे आणि आजार पसरवणारे जंतू येथे असतात. अशा ठिकाणी मोबाइल ठेवल्यास हे जंतू तुमच्या मोबाइलला चिकटतात. आपण शौचालयातून बाहेर येतो तेव्हा हात स्वच्छ धुतो पण मोबाइल साफ करणे शक्य नसते. त्यामुळे हे जंतू पुन्हा आपल्या हाताला चिकटतात. म्हणूनच टॉयलेटमध्ये मोबाइल घेऊन जाणे ही सवय अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते.
२. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शौचालयात मोबाइलचा वापर करणाऱ्यांना मूळव्याध होण्याची शक्यता दाट जास्त आहे. शौचालयात जास्तवेळ बसल्यामुळे नसा ताणल्या जातात, परिणामी मूळव्याध होण्याची शक्यता अधिक आहे. जितक्यावेळ आपण मोबाइलचा वापर कराल तितक्यावेळ आपल्याला कमोडवर बसावं लागेल. त्यामुळे गुद्दमार्गाच्या मांसपेशी ताणल्या जातात आणि मूळव्याधीचा धोका वाढतो.
३. शौचालयात टॉयलेट पेपर, स्प्रे अशा अनेक ठिकाणी जंतू असतात. मोबाइल आत नेल्याने आपल्या हाताला लागलेले जंतू मोबाइलच्या स्क्रीनला लागतात. फोनवर बोलल्याने मोबाइलवर चिकटलेले बॅक्टरीया श्वसनमार्गात प्रवेश करतात. त्यामुळे फ्लू, फंगल इन्फेकशन यासारखे आनेक गंभीर आजार होण्याची दाट शक्यता असते.
४. संडास करताना हातात मोबाइल असल्यास आपले सगळे लक्ष मोबाइलमध्येच असते. अशावेळी पोट पूर्णपणे नीट साफ होत नाही. त्यामुळे अपचन, पोट साफ न होणे, बद्धकोष्ठता यांसारख्या पचनाशी निगडीत तक्रारी उद्भवतात. त्यामुळे टॉयलेटला जाताना सोबत मोबाइल न नेलेलाच केव्हाही चांगला.

संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *