घरोघरी शिवजंयती साजरी व* कामगार सेनेच्या वतीने* *शिवजंयती साजरी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

सोलापूर दि.19/2/2022 श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्त् महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने घरोघरी शिवजंयती साजरी हा उपक्रम राबविण्यासह कामगार सेना कार्यालयात आनंदाने व उत्साहाने शिवजंयती साजरी करण्यात आली.
प्रारंभी छत्रपती शिवरायांचे महापुजन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणिस विष्णु कामरपुरी (महाराज) यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करुन महाआरती करण्यात आली आहे. त्यानंतर फटाक्याची हताषबाजी आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला. यावेळी विडी कामगार माता भगिनी बांधवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी या जय जयकाराने संपूर्ण परिसर घुमघुमुन गेला. त्यानंतर विडी कामगार महिला राहत असलेला कुचन नगर झोपडपटटी नं.1,2,3, संयुक्त् झोपडपटटी, लोधी गल्ली, झोपडपटटी, महात्मा झोपडपटटी, फलमारी झोपडपटटी, गिरी झोपडपटटी, राहुल गांधी झोपडपटटी, अशा विविध झोपडपटटी व कामगार वस्तीत राहणा-या महिला विडी कामगार कुटुबियांना पदमशाली चौक कार्यालयापासून डोल, ताशासह वाजत- गाजत शिवाजी महाराज मुर्ती देण्यात आली. यावेळी गरिब विडी कामगार महिलांनी आनंदात व उत्साहात शिवाजी महाराज मुर्ती घेऊन आपापल्या भावपूर्ण श्रध्देने मुर्ती स्थापन केल्या आणि गरिबांच्या घरी शिवराय आले. असे आनंद वाटत होते. कामगार सेनेच्या घरोघरी शिवजंयती साजरी या उपक्रमाचे ठिक ठिकाणी चर्चचा विषय ठरले आहे
महाराष्ट्र कामगार सेनेचे सदर कार्यक्रम विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्यासह दशरथ नंदाल, विठठल कु-हाडकर, रेखा आडकी, पवित्रा कारमपुरी, पप्पु शेख, मुनिनाथ कारमपुरी, गुरुनाथ कोळी, शिवा ढोकळे, सलीम शेख, प्रसाद जगताप, प्रशांत जक्का, रमेश चिलवेरी, हरिदास शेरला, मुमताज सय्य्द, लक्ष्मीबाई ईप्पा, राधिका ईप्पा, मिराबाई लच्छुवाले, मनश्री कारमपुरी, प्रेम आडकी यांच्यासह कामगार सेना पदाधिकारी व विडी कामगार महिला मोठया संख्येने उपस्थित होते.
============================
फोटोमॅटर – कामगार सेना कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज) व विडी कामगार बंधु- भगिनी दिसत आहोत/दुस-या छाया चित्रात घरोघरी शिवजंयती साजरी अंतरगतळ विडी कामगार महिलांना घरी जाऊन श्री शिवरायांची मुर्ती दिल्यानंतर शिवरायांच्या मुर्तीचे ओवाळणी करुन मुर्ती स्विकारतांना दिसत आहोत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *