नागरिकांच्‍या प्रेमाच्‍या व आशिर्वादाच्‍या बळावर मुल शहराला विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर करणार – आ. सुधीर मुनगंटीवार

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕मुल शहरात ८.५० कोटी रू. किंमतीच्‍या विकासकामांचे भूमीपूजन उत्‍साहात संपन्‍न.*

४७ वर्षे कॉंग्रेसची अनेक नगर परिषदांमध्‍ये सत्‍ता होती. त्‍यावेळची गावे आणि आताचे मुल शहर यातील फरक बघितल्‍यास मुल शहराची विकासासंदर्भात सुरू असलेली दमदार वाटचाल दिसुन येते. या शहरातील ना‍गरिकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. जाती पाती धर्माच्‍या बाहेर जावून प्रेम केले. मी सुध्‍दा सर्वशक्‍तीनिशी या शहराचा विकास केला. सर्वच कामे झाली असा दावा मी कधीच करणार नाही. मात्र नागरिकांच्‍या प्रेमाच्‍या व आशिर्वादाच्‍या बळावर या शहराला विकासाच्‍या मार्गावर सतत अग्रेसर करेन, अशी ग्‍वाही विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

मुल शहरात ८.५० कोटी रू. किंमतीच्‍या विशेष निधीतुन मंजूर विकासकामांचे भूमीपूजन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आले. यावेळी आयोजित जाहीर सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते.

यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, कॉंग्रेस-राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे बेईमानीचे सरकार येवून अडीच वर्षे झाली. सावली नगर पंचायतीची इमारत आजही खासदार अशोक नेते यांच्‍या निधीतुन बांधलेल्‍या सामाजिक सभागृहात कार्यान्‍वीत आहे. हे सत्‍ताधा-यांचे अपयश आहे. मुल शहरामध्‍ये विकासकामांची दिर्घ मालिका आम्‍ही तयार केली, या विकासकामांच्‍या दिर्घ मालिकेत प्रामुख्‍याने मुख्‍यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार स्‍मृती सांस्कृतीक सभागृहाचे बांधकाम, प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृहांचे बांधकाम, बसस्‍थानकाचे आधुनिकीकरण व नुतनीकरणाचे काम, माळी समाजाच्‍या विद्यार्थ्‍यांसाठी स्‍वतंत्र वसतीगृहाचे बांधकाम, डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत अतिरिक्‍त कार्यशाळेचे बांधकाम, इको पार्कचे बांधकाम, क्रिडा संकुलाचे बांधकाम, जलतरण तलावाचे बांधकाम, पाणी पुरवठा योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत अतिरिक्‍त कार्यशाळेचे बांधकाम, मुल शहरातील मुख्‍य मार्गाचे सिमेंटीकरण तसेच अंतर्गत रस्त्यांचे सिमेंटीकरण, मुल शहरातील वळण मार्गाचे बांधकाम, योगा भवनाचे बांधकाम, वळण मार्गाचे बांधकाम, मुल शहरातील आठवडी बाजार बांधकाम, पत्रकार भवनाचे बांधकाम, पंचायत समितीचे बांधकाम, भूमीगत विद्युत वाहिनीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, स्‍मशानभूमी बांधकाम, 24 तास पाणी पुरवठा करणारी पाणी पुरवठा योजना अशी विविध विकासकामे आम्‍ही मुल शहरात पूर्णत्‍वास आणली, असेही आ. मुनगंटीवार म्‍हणाले.

कोरोना काळात सर्वसामान्‍य नागरिकांना दिलासा देण्‍यासाठी आम्‍ही पुढाकार घेतला. सर्वात जास्‍त ऑक्‍सीजन कॉन्‍स्ट्रेटर आम्‍ही उपलब्‍ध केले. जिल्‍हा सामान्‍य रूग्‍णालयाला १७ व्‍हेंटीलेटर, १५ एनआयव्‍ही आम्‍ही दिले. कोरोना काळात सर्वच प्रकारची सेवा आम्‍ही नागरिकांना दिली. राजकारण हे सेवेचे माध्‍यम आहे. ही जाणीव ठेवूनच आम्‍ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. मुल शहरातील मुलांसाठी आम्‍ही अत्‍याधुनिक शाळेचे निर्माण केले. चंद्रपूर शहरात आम्‍ही टाटा ट्रस्‍टच्‍या सहकार्याने कॅन्‍सर हॉस्‍पीटल निर्माण केले. उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी एका बैठकीत चंद्रपूरसारखे कॅन्‍सर हॉस्‍पीटल बारामतीत निर्माण करण्‍याचा मनोदय व्‍यक्‍त केला तेव्‍हा मला मनापासून आनंद झाला. मुल ज्‍यांची कर्मभूमी आहे अश्‍या कर्मवीर मा. सा. कन्‍नमवार यांनी ऑडनन्‍स फॅक्‍टरी त्‍यांच्‍या कार्यकाळात चंद्रपूर जिल्‍हयात आणली. त्‍याच चंद्रपूर जिल्‍हयात देशातील अत्‍याधुनिक सैनिकी शाळेचे निर्माण मी करू शकलो याचा मला मनापासून आनंद आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.

यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे जिल्हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा सरचिटणीस नामदेव डाहूले, नगर परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, उपाध्‍यक्ष नंदकिशोर रणदिवे, प्रभाकर भोयर, चंदू मारगोनवार, प्रशांत समर्थ, चंद्रकांत आष्‍टनकर, अजय गोगुलवार, अनिल साखरकर, मिलींद खोब्रागडे, प्रशांत लाडवे, महेंद्र करकाडे, राकेश ठाकरे, प्रशांत बोभाटे, दादाजी येरणे तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

 

जाहीर सभेचे प्रास्‍ताविक अनिल साखरकर यांनी केले. जाहीर सभेला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती. यावेळी शहरातील दहा प्रभागांमध्‍ये सिमेंट कॉंक्रीट रोड, सिमेंट कॉंक्रीट नाली आदी विकासकामांचे भूमीपूजन ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *