छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर”

लोकदर्शन वालुर/प्रतिनिधी👉महादेव गिरी

वालुर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना शाखा वालुर व संजय साडेगावकर मित्रमंडळ यांच्या वतीने घेण्यात un आलेल्याभव्य रक्तदान शिबिरात 64 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 19 फेब्रुवारी शनिवार रोजी शिवसेना शाखा वालुर व संजय साडेगावकर मित्रमंडळ यांच्या वतीने पुढाकार घेऊन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ए.पि.आय.साईनाथ अनमोड यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.यावेळी
सरपंच संजय साडेगावकर, गणेश मुंढे, शैलेश तोष्णीवाल, विलास सोनवणे, श्रीहारी आबुज,अमोल कलाल,महेमूद टेलर , षडानन देशमाने सर,आदिंची प्रमुख उपस्थिती होती. राजेश साडेगावकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उदिष्ट सपष्ट केले. या शिबिरासाठी विषेस सहकार्य डॉ. दिपेशवर रासवे,राजेश शेरकर,प्रभाकर फरकांडे ,महादेव गिरी आदिंचे विशेष सहकार्य लाभले तर रक्तदान शिबिरासाठी मोहन डुमे,ऋषिकेश मुंढे अनिकेत भालेराव, गोपाळ थोरि,गजानन गडदे,गोपाळ आबुज, रहेमान पठाण, विषनु कटारे, भगवान शिवाजी सोनवणे, गणेश घाटुळ,विशाल खपले आदिंनी परीश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *