“संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी”

लोकदर्शन वालुर/ प्रतिनिधी👉महादेव गिरी

वालुर येथील स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्व.नागाबाई साडेगावकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वालमिकेशवर माध्यमिक विद्यालय राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. डि.भोकरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रतिष्ठित नागरिक सुनील आढे,आर.बि.राठोड, बि,व्हि।बुधवंत, एम. एस गिरी, डि.आर.नाईकनवरे, एस.ए.महाडिक आदिं उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूने यांच्या हस्ते राष्ट्रसंय सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुनील आढे यांनी संत सेवालाल महाराज यांनी केलेले कार्य विषद केले. त्याच बरोबर आर.बि.राठोड बि.व्हि.बुधवंत,डि.आर.नाईकनवरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचा समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष एस.डि.भोकरे यांच्या अध्यक्षीय भाषणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार एम.एस. गिरी यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने विध्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बळिराम शेंबडे,के.एस. राउत आदिंनी परीश्रम घेतले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *