आरोपीला मिडियासमोर आणताना त्याचा चेहरा का झाकतात? ही आहेत कारणं!

 

लोकदर्शन 👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

टेलिग्राम ग्रुप मध्ये सहभागी व्हा. 👇
https://t.me/+bVRL8lzGRQ83M2Jl

तुम्ही टीव्हीवर बऱ्याचदा पाहिलं असेल की जेव्हा बातम्यांमध्ये एखाद्या आरोपीला पकडल्याची बातमी दाखवली जाते, तेव्हा त्या आरोपीचा चेहरा झाकलेला असतो किंवा त्या आरोपीने स्वत:हून तो चेहरा झाकून घेतलेला असतो.

क्राइम पेट्रोल सीआयडी किंवा अगदी ताज्या बातम्यांमध्ये सुद्धा एखाद्या गुन्ह्यांची बातमी असेल तर जेंव्हा टीव्ही रेपोर्टर आणि कॅमेरा त्यांना कव्हर करायला येतो तेंव्हाच नेमके पोलिस त्या आरोपीच्या चेहऱ्याभोवती एक काळं फडक गुंडाळतात!

तर हे नेमकं का केलं जातं यांची काही कारणं या लेखात सांगणार आहोत!

उदा…
एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक झाली आणि त्याला चौकशीसाठी घेऊन जात असताना आपण पाहतो की त्याने चेहऱ्यावर रुमाल ठेवलेला असतो किंवा त्याने चेहऱ्यासमोर अशी एखादी गोष्टी धरलेली असते ज्याने त्याचा चेहरा दिसत नाही.

मुख्य म्हणजे तो असं करत असताना त्याच्या आजूबाजूचे पोलीस देखील त्याला काही बोलत नाही. याचा अर्थ ही गोष्ट त्यांच्या दृष्टीने बरोबर असावी.

पण सामान्य माणूस म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात असे विचार येत असतील की हा तर गुन्हेगार आहे त्याचा खरा चेहरा तर लोकांना कळायला हवा? फक्त नाव नाही तर त्याची ओळख देखील उघड व्हायला हवी, जेणेकरून त्याला चांगली अद्द्ल घडेल.

पण तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल की चेहरा न दाखवण्याची ही कृती कायदेशीररीत्या अगदी बरोबर आहे. चला जाणून घेऊया असं का?

या संदर्भात अशी एक अफवा आपल्या मनात आहे की आरोपी हे स्वत:ची मानहानी रोखण्यासाठी आपला चेहरा लपवतात, ही गोष्ट खरी नाही आहे. हा निव्वळ गैरसमज आहे.

पहिल्यांदाच गंभीर गुन्हा करणाऱ्या या आरोपींना स्वत: पोलिसांकडूनच चेहरा लपवण्याचा आदेश मिळतो. आपण एक उदाहरण पाहू म्हणजे तुमच्या अधिक स्पष्टपणे लक्षात येईल.

समजा ‘अ’ ला ‘ब’ वर झालेल्या हत्येच्या गुन्ह्यामध्ये अटक झाली आहे . आणि ‘क’ या गुन्ह्याचा तक्रारदार (साक्षीदार) आहे. तर न्यायालय हे ‘क’ ला तेव्हाच विश्वसनीय साक्षीदार म्हणून ग्राह्य धरेल जेव्हा ‘अ’ चा चेहरा सार्वजनिकरित्या प्रदर्शित (मिडिया मार्फत) केला जाणार नाही.

जर नॅशनल टेलिव्हिजनवर ‘अ’ चा चेहरा दाखवला आणि सर्वच देशाने तो पाहिला तर मग साक्ष घेण्याची गरज उरणार नाही. तसेच ‘क’ च्या साक्षीवर देखील अश्या वेळेस शंका उपस्थित होते, कारण आरोपीचा चेहरा उघड झाल्याने ‘क’ ला त्याची साक्ष बदलण्यात भाग पाडले जाऊ शकते.

अश्यावेळी ‘क’ ची साक्ष किती खरी असेल हे सांगता येत नाही. तसेच आरोपीचा वकील देखील याचा फायदा घेऊन साक्षीदाराला खोटे पडण्याचा प्रयत्न करू शकतो.

म्हणजेच आरोप सिद्ध होई पर्यंत गुन्ह्याच्या साक्षीवर कोणताही परिणाम होऊ नये तसेच निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आरोपीची ओळख लपवली जाते.

ज्याप्रमाणे पुराव्यांसोबत छेडछाड केली जाऊ नये म्हणून ते सुरक्षित ठेवले जातात त्याप्रमाणे आरोपीच्या ओळखीचा निकालावर परिणाम होऊ नये म्हणून त्याची ओळख लपवणे गरजेचे आहे असे Indian Evidence Act सांगतो.

परंतु त्याबद्दलची कोणतीही मार्गदर्शक तत्वे मात्र आखून देण्यात आलेली नाहीत. आरोपीला मिडीयासमोर आणल्यानंतर त्याचे फोटो किंवा व्हिडीयोज काढून पसरवले जाऊ शकतात, हीच गोष्ट टाळण्यासाठी एखादा कपडा किंवा मास्क लावून पोलीस आरोपीला स्वत:चा चेहरा झाकण्यास सांगतात.

परंतु एकदा का चौकशीअंती आरोपीने आपला गुन्हा कबूल केला किंवा त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला की मात्र त्याचा चेहरा झाकण्यात येत नाही.

आता तुम्ही म्हणत असाल की कधी कधी काही व्यक्तींना उघड्या चेहऱ्यासकट पोलीस घेऊन जातात असं का?

तर त्याच उत्तर हे आहे की –

अश्या व्यक्ती या सराईत गुन्हेगार असतात, त्यांचे फोटो पोलीस स्टेशनमध्ये व मिडीयामध्ये आधीच प्रदर्शित करण्यात आलेले असतात. प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीतही हेच लागू होतं. ज्यांना संपूर्ण देश ओळखतो आहे अश्या व्यक्तींचे चेहरे आरोपी म्हणून लपवून काहीच फायदा होत नसतो.

तर ही आहेत या गुन्हेगारांचा चेहरा लपवण्यामागची कारणं, खरतर या गुन्हेगारांना मीडिया समोर नाहीच आणलं पाहिजे पण आपल्यासारख्या देशात त्यासाठी काहीच पर्याय नाही, मीडिया वाले आणि रिपोर्टर कोणत्याही छोट्याशा बातमीसाठी कुठेही आणि कसेही प्रकट होतात, त्यामुळे गुप्तता पाळण कठीण होऊन बसते.

आता तुम्हाला खरे कारण कळले आहे, अहो मग इतरांनाही कळू द्या की! हा लेख जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे इतरांना देखील या प्रश्नाचा उलगडा होईल!

*विचारवेध – BEYOND THOUGHTS.*
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *