राष्ट्रवादी काँग्रेसचा आटपाडीतला मेळावा उत्साहात संपन्न !

लोकदर्शन 👉 राहुल खरात सर

*⭕भारततात्यांना नेतृत्व देण्याची अनेकांची मागणी .*

 

आटपाडी दि . ७
सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवावा . एकसंघपणे काम करीत, आता असणारे, पुर्वीचे निष्ठावंत आणि नव्याने येवू घातलेल्यांच्या योग्य समन्वयातून सर्वांना यथायोग्य संधी मिळेल असा आशावाद सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अविनाशकाका पाटील, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक आणि युवा नेते वैभवदादा पाटील यांनी व्यक्त केला .
ना . जयंतराव पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून अथकपणे वाटचाल करणाऱ्या भारततात्या पाटील यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी देण्याची मागणी आम्ही जयंतराव पाटील साहेबांकडे करू असे आश्वासनही या मान्यवरांनी यावेळी दिले .
आटपाडी जि.प. गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या आयोजित मेळाव्यात हे मान्यवर बोलत होते .
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष सुशांत देवकर, राष्ट्रवादीचे आटपाडी तालुक्याचे नेते भारततात्या पाटील, राष्ट्रवादीचे खानापूर विधानसभा मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक , युवा राष्ट्रवादीचे प्रदेशचे सचिव प्रा . एन .पी . खरजे , युवा नेते सौरभभैय्या पाटील, महिला राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षा सौ.अनिता पाटील, महिला राष्ट्रवादी च्या आटपाडी तालुका अध्यक्षा सौ. अश्विनी कासार अष्टेकर, राष्ट्रवादीचे नेते विलासनाना शिंदे, सरचिटणीस विजयराव पुजारी, विट्याचे शहर अध्यक्ष अविनाश चोथे, सामाजीक न्याय विभागाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सावंत, शहाजीराव जाधव, चंद्रकांत दौंडे, अतुल यादव ,जितेंद्र जाधव, सिध्देश्वर बाड , अशोक लवटे, मनोज भोसले , अरुण टिंगरे, राशीद जमादार, रविंद्र लांडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
येणाऱ्या कालावधीत जयंतराव पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सर्वांनी राष्ट्रवादी मजबुत बनविणे महत्वाचे आहे. येणाऱ्या जि प . आणि पं.स. निवडणूकीत पक्षाची ताकद दाखवून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तास्थानी आणावी . भारततात्या पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या कार्याचे योग्य मुल्यमापन होईल . भारततात्यांना राज्य स्तरावर संधी देण्यासाठी मी, बाबासाहेब मुळीक बापू , बाळासाहेबबापु पाटील, वैभवदादा पाटील असे सर्वजण ना . जयंतराव पाटील साहेबांकडे शब्द टाकू अशी ग्वाही अविनाशकाका पाटील यांनी यावेळी बोलताना दिली .
सभासद वाढीला सर्वत्र मोठा प्रतिसाद असून मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणीवर सर्वांनी लक्ष द्यावे . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वांना न्याय देणारी पार्टी आहे . यापुढे सर्वांना यथायोग्य संधी मिळणार आहे . त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे . ना . जयंतराव पाटील साहेबांनीच वैभवदादांना आटपाडी तालुक्यात लक्ष घालणेस सांगीतल्यानेच आटपाडी तालुक्यात हे कार्यकर्त्यांचे मेळावे सुरु आहेत, असे राष्ट्रवादीचे जिल्हयाचे कार्याध्यक्ष अँड. बाबासाहेब मुळीक यांनी स्पष्ट केले .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सभासद नोंदणी व्यापक प्रमाणात करण्यासाठीच या मेळाव्यांचे आयोजन केले आहे . खानापूर विधानसभा मतदार संघातून किमान १०००० सभासद व्हावेत. अशी अपेक्षा आहे . सर्वांनी मनाचा मोठेपणा दाखवून एकजुटीने काम करावे अशी आमची प्रांजळ भुमिका आहे . आम्ही पक्षात कार्यकर्ता म्हणून भूमिका मांडत असून काही मंडळीना गटा तटाच्या राजकारणात स्वारस्य आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काहींनी प्रायव्हेट लिमिटेड पार्टी केल्याचे स्पष्ट मत मतदार संघाचे युवा नेते वैभवदादा पाटील यांनी व्यक्त करून, स्व . रामभाऊ पाटील, भारततात्या पाटील यांनी सदाभाऊंच्या दोन्ही वेळच्या विजयात मोलाची भूमिका बजावल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला .
आम्ही व्यक्तीगत कामात अग्रेसर आहोत तथापि सार्वजनिक कामात कमी पडतो . गत १८ वर्षापासून जयंतराव पाटील साहेबांसोबत असून त्यांच्यावर निष्ठा ठेवून, त्यांच्याच आदेशाने काम करीत आलो आहे . पक्षातील काही मंडळी आमच्या बाबत गरळ ओकतात . ज्यावेळी कोणी नव्हते त्यावेळी आम्ही जाहीराती, पोस्टरसह जयंतराव पाटील साहेब आणि राष्ट्रवादीचा जयघोष करीत होतो .सर्वच जि.प . गटातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना रात्रंदिवस मी सहकार्य करीत आलो आहे . रात्री अपरात्री सुद्धा कार्यकर्त्यांच्या संकटावेळी त्यांच्या पाठीशी उभा राहीलो आहे . आटपाडी जि.प . गटातील सर्व गावे,वाडी, वस्त्यांसह तालुक्यातील सर्व गावातील कार्यकर्त्यांच्या, सामान्यांच्या पाठीशी यापुढेही भक्कमपणे उभा राहणार आहे . त्यांच्या समस्या सोडवणार आहे . सर्व जि .प . गट आणि पं .स . गणातील विजयासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आटपाडी तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते भारततात्या पाटील यांनी यावेळी केले.
लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या असे आवाहन मतदार संघाचे माजी अध्यक्ष आनंदरावबापु पाटील यांनी करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि नेते मंडळी कडून भारततात्या पाटील यांचा योग्य सन्मान लवकरच होईल अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
ना .जयंतराव पाटील साहेबांचा शब्द प्रमाण मानून निष्ठेने काम केल्यास विधानसभे बरोबर विधानपरिषदे वरील आमदारकी ही मतदार संघातल्या नेतृत्वाला मिळाल्याशिवाय राहणार नाही . नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्याचे नेतृत्व, भारततात्या पाटील यांच्याकडे द्यावे . हीच भावना शेकडो कार्यकर्त्यांची आहे . भारततात्या पाटील यांना तालुक्यातील कोणत्याही खुल्या जि.प . गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी द्यावी . जयंतराव पाटील यांच्या प्रत्येक कृतीतून शरद पवार साहेबच डोकावत असल्याचे जाणवते . जयंतराव पाटील हेच शरद पवार साहेबांची प्रतिकृती – सावली आहेत हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशचे महासचिव सादिक खाटीक यांनी यावेळी व्यक्त केल्या .
युवा नेते सौरभभैय्या पाटील यांनी, भारततात्या पाटील यांच्या नेतृत्वाला आणि त्यांच्या वर प्रेम करणाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली . निवडणुकीसह पक्ष संघटनेत तात्यांचे वलय असून कोणाच्या मागे किती माणसे आहेत किती ताकद आहे . याची नेत्यांनी चाचपणी करावी . सर्व सामान्यांसाठी आम्ही जीवाचे रान करू . रामभाऊ पाटील, भारततात्या पाटील यांचा जरी मी पुतण्या असलो तरी माझ्या अंगात पोपटनाना पाटील यांचे रक्त असल्याने हेतूपूर्वक वाकडे चालणाऱ्यांनी, आम्हांला डिवचणारांनी जरा सबुरीनेच घ्यावे . अशा भाषेत सौरभ भैय्या पाटील यांनी आपले मत मांडले . .
यावेळी विजय लक्ष्मणराव बालटे,रणजित चव्हाण, अमोल जाधव, विजय मिसाळ, मधुकर चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला .
प्रा . एन . पी . खरजे, विलासनाना शिंदे ,सौ. अनिता पाटील, सिध्देश्वर बाड, चंद्रकांत दौंडे, धनाजी लेंगरे ,अशोक लवटे, जितेंद्र जाधव, अनिल चव्हाण, नितीन कदम, रविंद्र लांडगे, सुभाष कदम इत्यादीनी यावेळी मनोगत व्यक्त केले . भारततात्या पाटील यांना तालुक्याचे नेतृत्व द्या अशी मागणी करणारी बहुतांश भाषणे यावेळी झाली . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मनोहर विभूते यांनी केले .

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *