गोंडवाना यंग टीचर्स च्या वतीने प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांचा सत्कार। ।।                                       

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
– गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे आधारस्तंभ डॉ.प्रदीप घोरपडे तर प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे ,सचिव प्रा.डॉ.विवेक गोरलावार,उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते ,डॉ. विजय वाढई,डॉ. सुनील नरांजे, सिनेट सदस्य डॉ.अक्षय धोटे, इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते
यावेळी सत्कारमूर्ती प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील संसाधने वनौषधी, सामाजिक प्रश्न, भाषा व संस्कृती इत्यादींच्या आधारावर नवनवीन अभ्यासक्रमाची निर्मिती करण्याचा मानस असल्याचे सांगून या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार प्राप्त होण्यावर विद्यापीठाचा भर राहील व शैक्षणिक गुणवत्तेसाठी विद्यापीठात भरीव कार्य करण्याचा मनोदय त्यांनी या वेळी व्यक्त केला. यावेळी अध्यक्षीय मनोगतात डॉ. प्रदीप घोरपडे म्हणाले डॉ. श्रीराम कावळे हे सर्वसमावेशक अभ्यासू व्यक्तिमत्व असून त्यांच्या कार्यकाळात विद्यापीठाचा नक्कीच विकास होईल असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. यावेळी डॉ. नंदाजी सातपुते डॉ.विवेक गोरलावार डॉ. प्रमोद बोधाने,डॉ.प्रशांत ठाकरे डॉ.सुदर्शन दिवसे यां सर्वांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉ. कावळे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला.
प्रास्ताविक व संचालनातून संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय गोरे यांनी डॉ.श्रीराम कावळे यांच्या सकारात्मक कार्याचा उल्लेख करून त्यांचे कार्य हे नेहमी प्राध्यापक व विध्यार्थी यांच्या हिताचे असल्याचे प्रामुख्याने सांगितले. यावेळी संघटनेच्यावतीने प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांना शाल,श्रीफळ व मानपत्र देऊन त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आभार डॉ. राजू किरमिरे यांनी मानले. यावेळी गोंडवाना विध्यापिठ यंग टीचर्स असोसिएशनचे विभाग समन्वयक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख यांनी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *