

लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
अखेर स्वप्न साकार केले,
*गडचांदुर
एखाद्याने दिलेला सल्ला आणि मार्गदर्शन मनाला इतकं स्पर्शून जाते की बदल आणि इतिहास घडवण्याची प्रबळ इच्छाशक्ति निर्माण होते आणि घडतो इतिहास ,हि गोष्ट कोण्या महापुरुषाची नसून दुर्गम मागास अशी जिल्हयात ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगाना राज्यातील सिमावादात अडकलेल्या चौदा गावापैकी एक पळसगुडा गावातील गणेश डुकरे या तरुणाची .
जेमतेम पन्नास ते साठ घरे अडिचशे ते तिनशे लोकसंख्या असलेल्या गावातील गणेशने बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आर्थिक परिस्थिति बेताची त्याने पुढील शिक्षणाचा विचार न करता पाटण येथील पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला वर्ग सुरु असतांना केंद्राचे संचालक भिमराव पवार यांनी गणेशचा उल्लेख करत म्हटले तुझ्या गावातुन तुच पहिला सरकारी नोकर ठरशील गावच्या इतिहासात तुझं नाव नोंद होईल मेहनत कर हे शब्द गणेशच्या मनात घर करुन बसले आणि मिच गावातील पहिला सरकारी कर्मचारी होणार अशी जिद्द उराशी बाळगुन गणेशने जिद्दीने मेहनत व अभ्यास केला आणि शेवटी तो दिवस उजाळला नुकत्याच झालेल्या अकोला विभागातील राज्य राखीव पोलिस दलात गणेश डुकरे याची निवड झाली.
याच्यासह जिवती तालुक्यातील नारपठार या लहानशा गावातील सत्यनारायण काकडे, राजु कदम हे सुध्दा गावातुन पहिले सरकारी नोकर ठरले .लोलडोह येथील तिरुपती चव्हाण सह चार जनांची राज्य राखीव पोलिस दलात निवड झाली आहे .
पाटण येथील आर्या दि बेस्ट पोलिस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्रातर्फे नवनियुक्त पोलिस शिपायांचा सत्कार ठेवण्यात आला होता यावेळी मनोगत व्यक्त करताना सत्यनारायण काकडे म्हणाला शहरात शिक्षण घेताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले केवळ एकच वेळ शिवभोजनावर दिवस काढले अर्धपोटी उपाशी राहुन शहरातले महागडे शिक्षण घेणे कठीण झाल्याने गावी परतलो ,व पाटण येथील प्रशिक्षण केंद्रात प्रवेश घेतला आणि आज यशस्वी झालो हा अविस्मरणीय आणि खडतर प्रवास होता हे सांगताना सत्यनारायणचे डोळे भरुन आले मनातले दुख :ओठावर येताच त्याने अश्रूंना वाट मोकळी करुन दिली .
आजपर्यंत आर्या दि बेस्ट युनियन पब्लिक अकॅडमीतुन ४६२ युवक युवतींना सरकारी नोकरी मिळाली आहे व आजघडीला दोनशेच्या जवळ युवक युवती सरकारी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगुन प्रशिक्षण घेत आहेत .
गणेश डुकरे याची राज्य राखीव पोलीस दलात नियुक्ती झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहेत,